May 15, 2026 6:05 am

पेढ्यातून गुंगीचं औषध देऊन महिलेवर अत्याचार; आजारपणाचा घेतला गैरफायदा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

भोंदू अशोक खरात, संगमनेर येथील गडगेबाबा यांचे प्रकरण ताजे असताना श्रीरामपुरात भोंदूगिरी व महिलेवर अत्याचार करणाऱ्या एका बाबाला शहर पोलिसांनी अटक केली आहे.

गणेश शिंदे असे या बाबाचे नाव असून, त्याने पेढ्यातून औषध देत महिलेवर वेळोवेळी अत्याचार केला. तसेच या बाबाने पिडित महिलेकडून १८ ते २० लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे.

हा बाबा आजारपण तसेच आर्थिक अडचणीतील भक्तांचा गैरफायदा घेत होता. बेलापूर येथील पढेगाव रस्त्यावरील खटकळी गावठाण येथील हा गणेश शिंदे बाबा आहे. त्याला शहर पोलिसांनी संध्याकाळी ताब्यात घेतले. पीडित महिलेने त्याच्याविरूद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. शिंदे हा त्याच्या राहत्या घरातूनच आश्रम चालवत होता. बेलापूर व श्रीरामपूर शहरातील शेकडो लोकांचा त्याचा भक्त परिवार होता. दररोज पाचशेपेक्षा अधिक लोक शिंदे याच्याकडे आपल्या समस्या घेऊन जात होते. गुरुपौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांचा उत्सव तेथे भरत होता. इतर दिवशी त्याच्याकडे कंदुरीचा प्रसाद केला जात होता.

दरम्यान, पीडित महिला ही बेलापूर परिसरातील आहे. तिला एक आजार जडलेला होता. त्या आजारातून आपली सुटका होईल, या अपेक्षेने तीन वर्षांपूर्वी ती गणेश शिंदे बाबाकडे गेली होती. शिंदे बाबा याने तिला लिंबू व उदिक वापरून इलाज केला. त्यातून बरे वाटल्याचा महिलेचा गैरसमज झाला. त्यामुळे तिचे बाबाकडे जाणे वाढले होते.

बाबाने महिलेला पेढ्याचा प्रसाद दिला. त्यानंतर घराच्या मागे नेऊन तिच्यावर अत्याचार केला, असे फिर्यादीत नमूद आहे. शहर पोलिसांनी शिंदे याच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी तसेच जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख हे अधिक तपास करत आहेत. गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.

भोंदू गणेश शिंदे हा गेल्या १० वर्षापासून खटकाळी गावठाण येथे आश्रम चालवत होता. त्याचे प्रस्थ गेल्या काही वर्षांमध्ये कमालीचे वाढले होते. शिंदे हा तत्पूर्वी बेलापूर येथे हमालीचे काम करत होता. त्याचे शिक्षण जेमतेम झाले आहे. त्याचे वय ४१ वर्षे आहे. दहा वर्षांपासूनच त्याने आध्यात्मिक क्षेत्रात प्रवेश केला. बेलापुरातील शेकडो लोक त्याच्याकडे नियमितपणे जात होते. परिसरामध्ये त्याचा मोठा भक्त संप्रदाय आहे.

पोलिसांनी सोमवारी शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास आता सुरू झाला आहे. खरात याच्याप्रमाणे गणेश शिंदे याच्या कृत्यांची माहिती त्याच्याच जवळच्या लोकांनी बाहेर फोडल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे याची काही प्रकरणे चव्हाट्यावर आली होती. मात्र, त्यात तडजोड होऊन मिटवली गेली होती.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!