May 15, 2026 9:11 am

४५ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्य संपवलं, नागपुरातील धक्कादायक घटना

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

नागपुरातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीकडून संपत्ती आणि घटस्फोटासाठी सुरू असलेला मानसिक छळ असह्य झाल्याने पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली.

अंबाझरी भागात घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी मृत पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शीलरत्न भीमराव बेलेकर असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. शीलरत्न हे प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. या प्रकरणात त्यांची ३२ वर्षीय बायको रुचिका बेलेकरचे आणि बॉयफ्रेंड महेश मेश्रामच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महेश मेश्राम हा पेशाने शिक्षक आहे. त्याचे मागील दोन वर्षांपासून रुचिकासोबत अफेअर होते. त्यांच्या अफेअरची माहिती पती शीलरत्नला मिळाली. त्यानंतर रुचिकाने शीलरत्नसोबत घटस्फोट आणि संपत्तीची मागणी केली. त्यानंतर शीलरत्न यांचा मानसिक छळ सुरू केला. ‘तू मरून जा’ असं म्हणत बायकोकडून छळ सुरू होता. रुचिकाचा बॉयफ्रेंड महेश देखील शीलरत्न यांना त्रास द्यायचा.

फेब्रुवारी महिन्यात शीलरत्न हे त्यांच्या भाऊ अजय बेलेकर यांच्याकडे आले. अजय यांची भेट घेऊन घरातून निघाले. त्यानंतर शीलरत्न यांचा कोणाशीही संपर्क झाला नाही. यामुळे त्यांच्या भावाने पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांच्या तपासात २४ फेब्रुवारी रोजी अंबाझरी तलावात शीलरत्न यांचा मृतदेह आढळला.

पोलिसांनी या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासात रुचिका आणि महेशने केलेल्या छळाला कंटाळून शीलरत्न यांनी आत्महत्या केल्याचे उघड झालं. या तपासाच्या आधारावर पोलिसांनी दोघांविरुद्ध आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!