April 17, 2026 4:30 pm

*कराडमध्ये Valentine Day ला शिक्षकाकडून भयंकर प्रताप

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील मलकापूर शहरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. इथं एका व्यक्तीने शिक्षकी पेशाला काळिमा फासला आहे. त्याने नववीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला वर्गाबाहेर बोलवून तिच्यासोबत विकृत कृत्य केलं आहे.

हा प्रकार व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच घडला. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी ही घटना सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील मलकापूर शहरात घडली. इथं व्हॅलेंटाईन डेला एका शिक्षकाने इयत्ता नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला ‘प्रपोज’ करून तिचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर शहरातील एका शाळेत पीडित मुलगी नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. 14 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास संबंधित शिक्षकाने विद्यार्थिनीला वर्गाबाहेर बोलवले होते. भीतीपोटी मुलगी तीन मैत्रिणींना सोबत घेऊन बाहेर गेली. मात्र शिक्षकाने इतर तिघींना वर्गात पाठवून पीडित मुलीला थांबवलं. तिचा हात पकडून तिला प्रपोज केला.

“मी तुला चार दिवस बोलवत होतो, तू का आली नाहीस? रात्री तीन वाजता व्हॉट्सॲपवर ऑनलाईन का असतेस? मी तुझ्यावर प्रेम करतो,” असं म्हणत शिक्षकाने तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असं वर्तन केलं आहे. या प्रकारानंतर घाबरलेल्या मुलीने शिक्षकाचा हात झटकून वर्गात धाव घेतली. ही घटना तिने आपल्या मैत्रिणी आणि कुटुंबीयांना सांगितली. या प्रकारानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. रविवारी कराड शहर पोलीस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!