April 17, 2026 4:29 pm

*आठ दिवस भीतीत, सोने विकल्यानंतर बिनधास्त

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

बारावीपर्यंत शिक्षण घेऊन भरतीसाठी प्रयत्न केला. अपयश आल्याने गवंडी काम करू लागला. कामावर जाण्याआधीपासूनच त्याचे गावातीलच एका महिलेशी सूत जुळले. न कळत्या वयात झालेल्या चुकांमुळे ‘ब्लॅकमेलिंग’सा सामोरे जावे लागले.

या चुका वैवाहिक आयुष्यात अडथळे ठरू लागल्याने महिलेला संपविण्याचे ठरवले. गडहिंग्लज तालुक्यातील महागावजवळ केलेल्या खुनानंतर आठ दिवस तो तरुण भीतीने गारठून गेला. पण, जसजसे दिवस पुढे गेले, तसे आपण केलेला खून ‘पचला’ असे समजून वावरणारा प्रवीण चिंचेवाडीच्या मुसक्या पोलिसांनी २५ दिवसांनी आवळल्याच.

गडहिंग्लज तालुक्यातील महागावजवळ मठपती शेतात बुधवारी (ता. ११) एका महिलेचा शिर नसलेला मृतदेह मिळून आला होता. तिचे शरीर वन्यप्राण्याने खाल्ल्याचे भासविण्याचा प्रयत्न संशयिताने केला होता.

पण, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने याचा उलगडा करण्याचा विडा उचलला. मुळात हा खून केव्हा झाला, मृत महिला कोण, खुनाचे कारण काय? खून की अन्य काही, असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर होते. अशात बेपत्ता महिलांची माहिती मिळविताना मिळालेल्या माहितीआधारे तपास गतिमान झाला.

दागिने चोरीस…

मृत महिलेची ओळख पटविण्यात पोलिसांना दुसऱ्याच दिवशी यश आले. मृत महिला भडगावमधील राहणारी असून गवंडी काम करीत होती, हे स्पष्ट झाले. नातेवाइकांनी साडी, चपलांवरून मृतदेह सुनीता केसरकर यांचा असल्याचे ओळखले. पण, मृतदेहावरील दागिने गायब असल्याचे समोर आले. यामुळे लुटीसाठी खून केला असावा का? असा एक धागा पकडून तपास फिरविण्यात आला.

गोवा, दोडामार्ग, बंगळूरनंतर परत गावी

१८ जानेवारीला सायंकाळी संगीता केसरकर घराबाहेर पडल्या. त्यानंतर त्या घरीच परत न आल्याने नातेवाइकांनी त्या बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. संशयिताने याच दिवशी तिचा खून करून मृतदेह ओळखणार नाही, यासाठी विद्रूप बनवला.

यानंतर आठ दिवस तो घराबाहेर पडला नाही. महागावमधील खुनाची कुठेही वाच्यता नसल्याने तो आठ दिवसांनंतर बिनधास्त झाला. गोवा, दोडामार्ग, बंगळूरपर्यंत जाऊन तो परत गावी परतला. २६ जानेवारीपासून तो गावात वावरूही लागला होता.

दागिने विकून टाकले…

संशयित प्रवीण चिंचेवाडी याने आपण केलेले कृत्य कोणालाही समजले नाही, अशा समजातून संगीता केसरकर यांच्या मृतदेहावरून चोरलेले दागिनेही विकून टाकले. या पैशातून त्याने स्वतःचा खर्च चालवला. आठ दिवस कामावर न गेल्याने त्याच्याजवळ दागिने विकण्याचाच पर्याय उरला होता.

अखेर मृतदेह मिळालाच…

खून करून पंचवीस दिवस उलटल्याने मृतदेह पूर्णपणे सडून गेला होता. पण, त्याची दुर्गंधी मुख्य मार्गावर येत होती. ११ फेब्रुवारीला पोलिसपाटील प्रदीप कांबळे यांच्या कानावर ही बाब येताच त्यांनी पोलिसांशी संपर्क केला. गडहिंग्लज पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बेपत्ता महिलांच्या यादीतून त्यांनी संगीता केसरकर यांचा मृतदेह असल्याचे ओळखून खुनाच्या तपासाला सुरुवात केली.

कारण ऐकून पोलिसही अवाक्

संगीता केसरकर यांच्यासोबत गवंडी काम करणारा व दहा ते बारा वर्षांपासून संपर्कात असलेल्या प्रवीण केसरकरवर संशय बळावताच त्याने पोबारा केला होता. दोन दिवसांनी त्याला शोधण्यात यश आले. शालेय शिक्षण घेतानाच त्याची संगीता हिच्याशी झालेली ओळख नाजूक प्रकरणात बदलली होती. पुढे प्रवीणचे लग्न झाले. तरी ‘ब्लॅकमेलिंग’च्या रुपाने ही ओळख अडचणच बनली. यातूनच आपण हा खून केल्याची कबुली त्याने दिल्याचे ऐकून पोलिसही अवाक् झाले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!