April 23, 2026 3:54 pm

*18 ट्रान्सजेंडर बांगलादेशी नागरिकांना पकडलं

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बांगलादेशी नागरिकांवर कारवाईचे आदेश दिले आहे. त्यानंतर आता मुंबईतील वर्सोवा भागात २१ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.

या २१ नागरिकांमध्ये 18 ट्रान्सजेंडर बांगलादेशी नागरिक असल्याचं उघड झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत वर्सोवा पोलिसांची मोठी कारवाई केली आहे. वर्सोवा सारख्या भागातून एकूण 21 बांगलादेशी ताब्यात घेतलं आहे. अंधेरी पश्चिम येथील यारीरोड आणि माहीम परिसरात धाडी टाकून 21 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. हे बांगलादेशी अवैधरित्या भारतात दाखल झाले होते. कोलकाता या राज्यातून थेट मुंबईत आले होते. एटीसी (ATC) पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली. या कारवाईत 18 ट्रान्सजेंडर, 1 महिला आणि 2 पुरुष असे 21 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. आरोपीकडून बांगलादेशी नागरिक असल्याचा पुरावा जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

४ महिन्यात तब्बल २७६ बनावट जन्मप्रमाणपत्र उघड

दरम्यान, मुंबई पालिकेच्या महापौरपदी भाजपच्या महापौर म्हणून रितू तावडे विराजमान झाल्या असून पदभार स्वीकरला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर रितू तावडे यांनी मुंबईकरांच्या महत्त्वाच्या अशा अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. फेरीवाल्यावर कारवाईचे आदेश दिले आहे. तसंच बांग्लादेशी रोहिंग्यांच्या मुद्यावरही त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. मागील ४ महिन्यात तब्बल २७६ बनावट जन्मप्रमाणपत्र उघड झाले आहे. तसंच, अनधिकृत बांगलादेशी ना पाठीशी घालण्याचे काम पालिका अधिकारी करत असतील तर कारवाई केली जाणार आहे. ⁠१५ दिवसांचा कालावधी दिला आहे. ⁠पालिका अधिकाऱ्यांनी माहिती असून कामाला सुरुवात केली का नाही? असा सवालही त्यांनी उपस्थितीत केला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!