April 23, 2026 5:20 pm

*मर्डर, आत्महत्या की एकतर्फी प्रेम? व्हॅलेंटाईनच्या तोंडावर ‘लव्ह बर्ड्स’च्या मृत्यूचे गूढ वाढलं

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

व्हॅलेंटाईन विक सध्या देशभर साजरा होत आहे. प्रेमी युगुल व्हॅलेंटाईन विक कसा चांगाल होईल याचं प्लॅनिंग ही करत आहे. प्रेमी युगुलांचा हा हक्काचा आठवडा. अशा या वातावरणा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

एकमेकांवर अपार प्रेम करणाऱ्या एका जोडप्याचा गुढ मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलीसही हादरून गेले आहे. हरियाणाच्या सिरसा येथील ही घटना आहे. एकाच खोलीत दोघांचे ही मृतदेह सापडले आहेत. मुलगी बेडवर मृतावस्थेत तर मुलगा गळफास लावलेल्या आवस्थेत सापडला आहे. त्यामुळे सिरसामध्ये खळबळ उडाली आहे.

आर्केस्ट्रा डान्सर सिमरन आणि सुनील यांच्या मृतदेहांच्या तपासणीनंतर अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. सिमरन गेल्या तीन महिन्यांपासून शिरसा येथे राहत होती. सुनीलचे तिच्यावर प्रेम होते. मात्र सिमरन दुसऱ्या एका तरुणाच्या संपर्कात असल्याने सुनील संतप्त झाला होता. या त्रासाबाबत सिमरनने आपल्या मावशीकडे तक्रारही केली होती. आता पोलिसांनी दोघांचेही मोबाईल फोन जप्त केले असून कॉल डिटेल्सच्या माध्यमातून या मृत्यूचे गूढ उकलण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिवापाड प्रेम करणारे हे दोघे ही एकाच दिवशी मृतावस्थेत सापडले आहेत.

सिमरनचा विवाह 13 वर्षांपूर्वी भिवानी येथील रवीशी झाला होता. मात्र गेल्या तीन वर्षांपासून ती पतीपासून वेगळी राहत होती. तिला 11 वर्षांचा मुलगा आहे. तो वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहे. सिमरनने आधी तिच्या मावशीकडे आश्रय घेतला होता. पण कामासाठी ती सिरसा येथे स्थायिक झाली होती. मंगळवारी तिचा मृतदेह बेडवर, तर सुनीलचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने पोलिसांनी हत्येची शक्यताही नाकारलेली नाही. दोघांच्या ही मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. त्यामुळे ही हत्या आहे की आत्महत्या याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

सिरसामध्ये झालेल्या या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सिमरनचा मृतदेह तिच्या खोलीत बेडवर आढळला, तर त्याच खोलीत सुनील नावाच्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली होती. प्राथमिक अंदाजानुसार, सुनीलने आधी उशीने तोंड दाबून सिमरनची हत्या केली असावी आणि त्यानंतर स्वतःला संपवले असावे. मात्र, पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. सिमरनसोबत काम करणाऱ्या बग्गा सिंह यांनी सांगितले की, सिमरन अनेक ग्रुपसोबत कार्यक्रमांना जात असे. मंगळवारी रात्री तिला खोलीवर सोडून गेल्यानंतर ही घटना घडली. विशेष म्हणजे, सिमरनच्या ओळखीच्या कोणालाही सुनीलबाबत माहिती नव्हती. सुनीलचा भाऊ पोलीस दलात असल्याची माहिती समोर आली असून, त्याने सुनीलला सिमरनला त्रास देऊ नको, असा सल्ल दिल्याचेही सांगण्यात येत आहे. या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!