April 23, 2026 4:54 pm

*ध्वजारोहणाला दांडी मारणे पडणार महागात

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

ध्वजारोहणाला दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचा ठराव संमत करून मडगाव नगरपालिकेच्या मावळत्या मंडळाने पालिका कर्मचाऱ्यांना शिस्तीचा धडा शिकवला आहे.

मडगाव नगरपालिकेच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत पालिका कारवाईचे स्वरूप जाहीर करणार आहे.

राज्यात लवकरच पालिका निवडणुका होणार असून राज्यातील बहुतेक पालिकांचा कार्यकाळदेखील येत्या दीड महिन्यात संपुष्टात येणार आहे. मडगाव नगरपालिका मंडळाचा अर्थसंकल्प सादर करावयाचा असल्याने कार्यकाळ संपण्यापूर्वी आणखी एक बैठक पार पडण्याची शक्यता आहे.

पालिका बैठकीत बेशिस्त वागणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विषय बराच चर्चेत आला. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला कर्मचाऱ्यांनी दांडी मारण्याचा विषय पालिका मंडळाने उचलून धरला.

पालिकेच्या ध्वजारोहणासारख्या अधिकृत शासकीय कार्यक्रमांना गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी बैठकीत दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भातील अंतिम निर्णय पुढील दोन दिवसांत घेण्यात येणार आहे.

याशिवाय, निवडणूक आयोग व जिल्हाधिकाऱ्यांकडून बीएलओच्या ड्युटीच्या वेळापत्रकाबाबत स्पष्टता मागविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीत शहरातील कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी नगरपरिषदेने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे ठरविण्यात आले असून, शहरात २५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच केंद्र शासनाच्या ३० लाख निधीतून नाईट सॉईल टँकर खरेदी करण्यात येणार आहे.

कचरा व्यवस्थापनात सुधारणा…

सध्या वापरात असलेल्या तीन जुन्या कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांचे आधुनिकीकरण करून कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या उपाययोजनांमुळे शहरातील स्वच्छता व कचरा व्यवस्थापन सुधारण्यास मदत होणार असल्याचा विश्वास नगराध्यक्ष शिरोडकर यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!