April 23, 2026 3:31 pm

*मालेगावात महापालिकेची लिफ्ट कोसळण्याचा ‘थरार’

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

महापालिकेत महापौर आणि उपमहापौर निवडीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच, शनिवारी दुपारी महापालिका इमारतीत एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. क्षमतेपेक्षा जास्त लोक लिफ्टमध्ये शिरल्याने चौथ्या मजल्यावरील लिफ्ट अचानक पहिल्या मजल्यावर येऊन आदळली.

यामध्ये माजी आमदार आसिफ शेख, नगरसेवक आणि पत्रकारांसह १८ जण सुमारे १५ मिनिटे अडकून पडले होते.

शनिवारी मालेगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक पार पडली. यामध्ये महापौरपदी इस्लाम पक्षाच्या नसरीन बानो शेख तर उपमहापौरपदी समाजवादी पार्टीचे शान-ए-हिंद निहाल अहमद यांची निवड झाली. या विजयानंतर जल्लोष सुरू असतानाच, ही घटना घडली.

इस्लाम पक्षाचे संस्थापक व माजी आमदार आसिफ शेख आणि समाजवादी पार्टीचे नेते मुस्तकीम डिग्निटी हे विजयानंतर चौथ्या मजल्यावरील सभागृहातून खाली येण्यासाठी लिफ्टमध्ये शिरले. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी काही पत्रकार आणि उत्साही कार्यकर्तेही लिफ्टमध्ये शिरले. मात्र, प्रमाणापेक्षा अधिक वाढलेल्या कार्यकर्त्यांनी केलेली घाई सर्वांच्या अंगाशी येता-येता राहिली.

भार क्षमतेची ‘ऐशी की तैशी’

महापालिकेच्या लिफ्टची वहनक्षमता साधारणपणे ६८० किलो ग्रॅम इतकी आहे. मात्र, उत्साहाच्या भरात लिफ्टमध्ये चक्क १८ जण शिरले. एवढे लोक जाणार नाहीत,असे म्हणत काही कार्यकर्त्यांनी लिफ्टमधून बाहेर निघावे,असे आसिफ शेख यांनी बजावले. तेव्हा दरवाजे उघडे असताना तसेच हे कार्यकर्ते बाहेर पडण्यापूर्वीच लिफ्ट आधी चौथ्या मजल्यावरून अचानक तिसऱ्या मजल्याजवळ येऊन धडकली. पुढच्याच क्षणी दुसऱ्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर येऊन ती अडकली.

श्वास रोखणारा ‘थरार’

लिफ्ट खाली कोसळून पहिल्या मजल्याजवळ अडकली. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे लिफ्ट मधील प्रवाशांची पाचावर धारण बसली. दरम्यान लिफ्टमधील फॅन बंद पडला. तत्पूर्वी फॅनजवळ स्पार्किंग झाली. आपण बाहेर पडू का याबद्दल त्यांना भीती देखील वाटू लागली. लिफ्टचा अपघात झाल्याचे समजताच महापालिका कर्मचाऱ्यांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले. या घटनेमुळे महापालिका परिसरात प्रशासकीय धावपळ, लोकांमधील घबराट व गोंधळ असे वातावरण होते. काही कार्यकर्त्यांनी तातडीने लिफ्टचे दरवाजे वाकवून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाच्या जवानांनी लिफ्टची पीओपी भिंत उघडून १५ ते २० मिनिटांनी सर्वांना सुखरूप बाहेर काढले. लिफ्टमधून बाहेर पडल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!