April 23, 2026 9:08 pm

*Live मॅचमध्ये रत्नागिरीच्या क्रिकेटपटूचा मृत्यू,

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

क्रिकेटची मॅच खेळत असतानाच खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरीच्या चिंचखरी येथे घडली आहे. ही मॅच लाईव्ह दाखवली जात असल्यामुळे खेळाडू मैदानातच कोसळल्याचा व्हिडिओही रेकॉर्ड झाला आहे.

प्रवीण पवार असं या खेळाडूचं नाव आहे. रत्नागिरी शहरासह आसपासच्या परिसरामध्ये प्रवीणने क्रिकेट खेळून नाव कमावलं होतं, त्याच्या निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

स्थानिक क्रिकेट मॅच सुरू असताना प्रवीणच्या टीमची बॅटिंग सुरू होती आणि तो नॉन स्ट्रायकर एन्डला उभा होता. तेव्हाच प्रवीण अंपायरच्या अंगावर कोसळला. सुरूवातीला प्रवीणला चक्कर आल्याचं मैदानातील खेळाडू आणि प्रेक्षकांना वाटलं, पण पुढच्या काही सेकंदांमध्येच परिस्थिती गंभीर झाली. मैदानात असलेले खेळाडू, अंपायर आणि आयोजक ताबडतोब प्रवीणच्या दिशेने धावले आणि त्याला प्रथमोपचार दिले.

प्रवीण प्रथमोपचारांनाही प्रतिसाद देत नसल्यामुळे त्याला लगेच जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. प्रवीणचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. प्रवीण मैदानामध्येच कोसळला त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. नॉन स्ट्रायकर एन्डला उभा असलेला प्रवीण अचानक अंपायरच्या अंगावर पडल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

प्रवीण पवार हा रत्नागिरी आणि आसपासच्या परिसरात स्थानिक स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचा. स्थानिक क्रिकेटमध्ये प्रवीणने नाव कमावलं होतं, तसंच त्याने टीमला अनेक स्पर्धाही जिंकवून दिल्या होत्या.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!