April 23, 2026 5:12 pm

*बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवचं तिहार तुरुंगात आत्मसमर्पण

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

दिल्ली उच्च न्यायालयाने २ फेब्रुवारी रोजी बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव याला आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर आता राजपाल तिहार तुरुंग अधीक्षकांकडे शरण गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राजपाल याने सुरुवातीला न्यायालयाकडून वेळ मागितला होता. परंतु ४ फेब्रुवारी रोजी त्याच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने वेळ देण्यास नकार दिला होता. त्यावेळीही न्यायालयाने त्याला आत्मसमर्पण करण्याची सूचना दिली होती.

काय आहे प्रकरण?

हे प्रकरण २०१० चे आहे. येथे राजपाल यादवने आपली डायरेक्टोरियल डेब्यू चित्रपट ‘अता पता लापता’ साठी मुर्गली प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीकडून ५ कोटींची रक्कम लोन म्हणून घेतली होती. मात्र राजपाल यादवने ही रक्कम कंपनीला परत केली नाही. राजपालने अनेकदा पैसे देण्याच्या नावाखाली चेक दिला, मात्र त्याने दिलेले सर्व चेक बाऊन्स झाले. ज्यानंतर कंपनीने त्याच्याविरोधात चेक बाऊन्सची तक्रार दाखल केली. ट्रायल कोर्टाने राजपाल यादवला दोषी मानत या प्रकरणात सहा महिन्यांची शिक्षा सुनावली होती.

राजपालने या निर्णयाविरोधात अपील केली, ज्यावर २०२४ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने २०२४ मध्ये तात्पुरती स्थगिती दिली होती. त्यावेळी राजपालने सामंजस्यात पैसे परत करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र अद्यापही त्याने पैसे दिलेले नाही. आता दिल्ली उच्च न्यायालयाने राजपालला त्याची तुरुंगवासाची शिक्षा पूर्ण करावी असा निर्णय दिला आहे. न्यायालयाने असेही स्पष्ट केलं की, न्यायालयाने दिलेली शिक्षा पूर्ण करणे कायद्याचा भाग आहे. न्यायालयाने म्हटलं की, कायद्याचा अनादर करणाऱ्यांनी दिलासा मिळण्याची अपेक्षा करू नये.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!