April 23, 2026 4:58 pm

*नागपुरातील एमएच ४० एन हॉटेलमधील देहव्यापारावर छापा; टोळीचा पर्दाफाश

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ‘एमएच ४० इन’ या ओयो हॉटेलवर घरफोडी विरोधी पथकाने छापा टाकून राज्याबाहेरील महिलांना आर्थिक आमिष दाखवून देहव्यापारात ढकलणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला.याप्रकरणी हॉटेलच्या व्यवस्थापकाला अटक केली असून तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

निखिल नीलकंठ सोनवणे (वय २७, रा. भीमनगर, चांदूर रेल्वे, अमरावती) असे आरोपी व्यवस्थापकाचे नाव आहे. हॉटेलचे मालक योगेश कैलास ठाकरे, हर्षल कैलास ठाकरे (रा. अमरनगर, वानाडोंगरी) आणि भागीदार संतोष गणपत बिसेन (रा. अमरनगर, एमआयडीसी) हे आरोपी फरार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वानाडोंगरी येथील संगम रोडवर असलेल्या डेंटल कॉलेजजवळ हॉटेल एमएच ४० नावाचे ओयो हॉटेलमध्ये देहव्यापार सुरू असल्याची माहिती घरफोडी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक दिलीप चंदन यांच्या नेतृत्वातील पथकाला मिळाली. त्यांनी सापळा रचून मंगळवारी (ता.३) सायंकाळी पावणेपाच वाजताच्या सुमारास हॉटेलवर छापा टाकला. तेव्हा व्यवस्थापक निखिल सोनवणे याच्या माध्यमातून तीन पीडित महिलांना आर्थिक आमिष दाखवित त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेत असल्याचे आढळले. पथकाने महिलांची सुटका करून आरोपी निखिलला अटक केली. तसेच दोन मोबाईल फोन, रोख रक्कम, कार, हॉटेल रजिस्टर असा एकूण ३ लाख ४१ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दोन महिला लुधियानाच्या

चौकशीत योगेश आणि हर्षल यांनी काही वर्षांपूर्वी हॉटेल चालविण्यास घेतले असून संतोष हा त्यांचा भागीदार असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी निखिलसह चौघांविरोधात एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान सुटका केलेल्या तीनपैकी दोन महिला पंजाबमधील लुधियाना येथील असून एक महिला उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील असल्याची माहिती समोर आली.

व्यवस्थापकाकडून दाखवले जात होते आमिष

व्यवस्थापक निखिल याच्या संपर्कात तिन्ही पीडिता होत्या. त्यांना आर्थिक आमिष दाखवून त्यांना नागपुरात बोलावून घेतले होते. त्यासाठी त्यांनी विशिष्ट रक्कमही देण्याचे ठरविले होते. त्यातूनच त्या गेल्या काही महिन्यात अनेकदा हॉटेलमध्ये आल्याची माहिती आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!