April 23, 2026 5:10 pm

*द्वारका भागातील वाहतूक कोंडीवर उपाय

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

द्वारका परिसरातील कायमस्वरूपी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या वतीने सारडा सर्कल ते काठे गल्ली सिग्नलदरम्यान भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात आले असून, मंगळवारी (ता. ३) प्रत्यक्षात मार्गाच्या खोदकामास मुहूर्त लागला. पुणे रोडवरील काठे गल्ली सिग्नलजवळ असलेल्या आयडीबीआय बँकेसमोरील भागातून सकाळी आठ वाजता खोदकामास सुरुवात करण्यात आली.

भुयारी मार्गाच्या कामाअंतर्गत सर्वप्रथम मार्गाच्या दोन्ही बाजूंना संरक्षक भिंती उभारण्यात येणार असून, त्या अनुषंगाने सध्या खोदकाम सुरू आहे. भिंतींचे काम पूर्ण झाल्यानंतर एका बाजूने हलक्या वाहनांची वाहतूक सुरू ठेवण्यात येणार असून, दुसऱ्या बाजूने भुयारी मार्गासाठी मुख्य रस्त्याचे खोदकाम करण्यात येणार आहे.

दरम्यान, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कामाच्या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी मोठ्या उंचीचे बॅरिकेटिंग उभारण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. या कामामुळे शालीमारकडून द्वारकाकडे जाणारी वाहतूक सारडा सर्कल येथे बॅरिकेटिंग लावून पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसेच काठे गल्ली सिग्नलकडून द्वारकाकडे येणारी वाहतूकही बॅरिकेटिंगच्या कामासाठी तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे.

दिवसभर काम आणि वाहतूक एकाच वेळी सुरू असल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. सायंकाळी द्वारकाकडे जाणारी वाहतूक पूर्णतः थांबविण्यात आल्यामुळे पर्यायी मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. बॅरिकेटिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर भुयारी मार्गाचे सर्व काम एकाच वेळी सुरू करण्यात येणार असून, त्यामध्ये खोदकाम, उच्च दाबाच्या विद्युत तारा स्थलांतरित करणे, ड्रेनेज पाइपलाइन टाकणे आदी विविध कामांचा समावेश आहे.

काम सुरू असलेल्या ठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी (ता. ४) पासून अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात येणार असून, पुढील दहा ते पंधरा दिवस हलक्या वाहनांची वाहतूक सुरू राहील. त्यानंतर हलक्या वाहनांचीही वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सारडा सर्कल भागात तीव्र वाहतूक कोंडी

सारडा सर्कल परिसरात मोठ्या उंचीचे बॅरिकेटिंग उभारण्यासाठी खांब उभे करण्यात येत असल्याने मंगळवारी सायंकाळी द्वारकाकडे जाणारी वाहतूक अचानक बंद करण्यात आली. पर्यायी मार्गांची पूर्वसूचना न मिळाल्याने वाहतूक नॅशनल उर्दू हायस्कूल–मदिना चौक मार्गे वळविण्यात आली. त्यामुळे वाहनचालकांची मोठी तारांबळ उडाली आणि सारडा सर्कल चौकात दीर्घकाळ वाहतूक कोंडी झाली.

अचानक झालेल्या या बदलामुळे कार्यालयीन वेळेत नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला असून, वाहतूक पोलिसांकडून नियोजनबद्ध व्यवस्थापनाची मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!