April 23, 2026 6:41 pm

*राष्ट्रीय थाई बॉक्सिंग प्रो लीगचा थरार

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

महाबळेश्वर–पंचगणी येथे दि. ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ दरम्यान राष्ट्रीय थाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप (प्रो लीग) अत्यंत उत्साहात व यशस्वीरित्या पार पडली. या राष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत देशभरातून सुमारे ४०० ते ५०० खेळाडूंनी सहभाग नोंदवून आपल्या उत्कृष्ट तांत्रिक कौशल्याचे, शारीरिक क्षमतेचे आणि लढाऊ वृत्तीचे दमदार सादरीकरण केले.

तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सातत्यपूर्ण आणि आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला. छत्तीसगड संघाने द्वितीय, गुजरात संघाने तृतीय, तर कर्नाटक संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला. प्रत्येक लढतीत खेळाडूंनी शिस्त, कौशल्य आणि क्रीडास्पर्धेची भावना जपली.

विजेत्या संघांना व खेळाडूंना भारतीय थाई बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष श्री. पी. वाय. आत्तार सर (जनरल सेक्रेटरी – इम्रान सर, उत्तरप्रदेश), तांत्रिक संचालक संतोष खैरनार सर, सोनावणे सर (पी.एस.आय., सातारा जिल्हा) तसेच वन अधिकारी राहुल निक्कम सर यांच्या शुभहस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

महाराष्ट्र थायबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष श्री. विशाल माळी सर, सचिव श्री. अजय खेडकर सर, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. सागर कोळी सर, खजिनदार श्री. गणेश मांढरे सर, पुणे विभाग प्रमुख श्री. अमोल माने सर आणि मुंबई विभाग प्रमुख हरी ओम चव्हाण सर यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत त्यांच्या कामगिरीचे मनापासून अभिनंदन केले.

स्पर्धेच्या यशात पंच व रेफरींची भूमिका महत्त्वाची ठरली. श्री. नजीम शेख सर, श्री. अजय खेडकर सर, अरुणा हिवरकर आणि शुभांगी साहरे यांनी अत्यंत निष्पक्ष, शिस्तबद्ध व दर्जेदार पंचायतीचे काम पार पाडले.

याचबरोबर, प्रो लीग रिंग फाईटमध्ये प्रो बेल्ट व ११ हजार रुपये रोख पारितोषिक पटकावणाऱ्या पिंपरी–चिंचवड परिसरातील विजयी खेळाडूंनी विशेष लक्ष वेधले.

मुली विभाग: सई धायगुडे, सना शेख, सायली गाढवे, शरयू म्हात्रे, श्रेया भोसुरे

मुले विभाग: अमित कुमार, इसक्की तेवर, असिफ शेख, ओम पांढरकर, साहील काळे, यासिर बागवान

या भव्य राष्ट्रीय स्पर्धेचे यशस्वी आयोजन श्री. वझीर शेख व श्री. रवीराज गाढवे यांनी केले. त्यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे व व्यवस्थापन कौशल्यामुळे स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध, सुरक्षित आणि प्रेरणादायी ठरली.

एकूणच, ही राष्ट्रीय थाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप भारतीय थाई बॉक्सिंगसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरली असून, नवोदित खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आगेकूच करण्यासाठी नवी ऊर्जा आणि प्रेरणा देणारी ठरली आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!