April 23, 2026 9:15 pm

*बीडमधील ‘त्या’ हादरवणाऱ्या घटनेचा अखेर उलगडा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

बीड (Beed) जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत माणुसकीला हादरवणारी आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीने मोबाईल फोन घेऊन दिला नाही, या कारणावरून संतप्त झालेल्या महिलेने आपल्या चार वर्षीय चिमुकल्याला विहिरीत ढकलून दिले आणि त्यानंतर स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बीड तालुक्यातील लिंबारुई गावातील एका विहिरीत 31 डिसेंबर 2025 रोजी प्राजक्ता उर्फ रामेश्वर दराडे आणि तिचा चार वर्षीय मुलगा वेदांत रामेश्वर दराडे यांचे मृतदेह आढळून आले होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यावेळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

पत्नीने देखील केली आत्महत्या

मात्र, या घटनेचा सखोल तपास करण्यात आल्यानंतर धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पोलीस तपासात असे निष्पन्न झाले की, प्राजक्ता दराडे हिचा पतीसोबत मोबाईल फोनच्या कारणावरून वारंवार वाद होत होता. पतीने मोबाईल घेऊन देण्यास नकार दिल्याने ती मानसिक तणावात होती. याच तणावातून तिने टोकाचे पाऊल उचलत प्रथम आपल्या चार वर्षीय मुलाला विहिरीत ढकलले आणि त्यानंतर स्वतःही आत्महत्या केली. खून करून या महिलेने आत्महत्या केल्याने यानुसार आता ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविला गेला आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!