April 23, 2026 5:03 pm

*निवडणूक काळात धारदार हत्यारांसह तरुण जेरबंद

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कडेकोट पोलिस बंदोबस्तात बारामती (Baramati) तालुका पोलिसांनी कारवाई करत एका तरुणाला तलवार व कोयत्यासारखी धारदार हत्यारे बाळगताना रंगेहाथ पकडले आहे.

ही कारवाई संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर रूई ब्रिज परिसरात करण्यात आली.

दि.2 फेब्रुवारी रोजी बारामती तालुका पोलीस निवडणुकीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग सुरू असताना एका बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली. एका होंडा युनिकॉर्न दुचाकीवरून एक इसम तलवार व कोयता बाळगून एमआयडीसीकडून भवानी नगरच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सापळा रचला.

रूई ब्रिजखाली संशयित दुचाकी अडवून तपास केला असता ओंकार रामचंद्र काळे (वय १९ रा. सणसर ता. इंदापूर जि.पुणे) असे आरोपीचे नाव निष्पन्न झाले. त्याच्या दुचाकीच्या डाव्या बाजूला असलेल्या पांढऱ्या रंगाच्या पिशवीतून दोन लोखंडी तलवारी व एक धारदार कोयता मिळून आला. पंचांच्या उपस्थितीत पोलिसांनी झडती घेऊन ही सर्व हत्यारे तसेच दुचाकी जप्त केली.

यात होंडा युनिकॉर्न दुचाकी (एम.एच. 42 बी.जी 7377) अंदाजे किंमत 30,000 रु.,पितळी मुठ असलेली तलवार ( 67 सेमी) अंदाजे किंमत 1,500 रु, लोखंडी तलवार (45 सेमी) अंदाजे किंमत 500 रु, लोखंडी धारदार कोयता अंदाजे किंमत 300 रु. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 32,300 रु. इतकी आहे. बेकायदेशीररीत्या हत्यारे बाळगल्याप्रकरणी आरोपी ओंकार काळे याच्याविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव तसेच अमोल कदम पोलीस उपनिरीक्षक बारामती तालुका आणि पोलीस अंमलदार सुरेंद्र वाघ मनोज पवार अवधूत शिंदे भारत खारतोडे दादा दराडे यांनी केली आहे.

‘कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. बेकायदेशीर हत्यारे बाळगणे, दहशत निर्माण करणे, धमकावणे किंवा संशयास्पद हालचाली करताना कोणीही आढळून आल्यास संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

 

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!