April 23, 2026 5:06 pm

*बिबट्याचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक थर्मल ड्रोन

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

बिऊर (ता. शिराळा) येथील अमृतनगर परिसरात राजवीर हणमंत पाटील या सहावर्षीय बालकावर हल्ला करून नरभक्षक बनलेल्या बिबट्यास जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तीन दिवसांपासून शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत, उपाययोजना सुरू केल्या आहेत.

मात्र अद्याप बिबट्याचा मागमूस लागलेला नाही.त्यामुळे वन विभागाच्या प्रयत्नांना अधिक बळ देण्यासाठी आज पुणे येथील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट (पुणे) व कोल्हापूर रेस्क्यू पथक दाखल झाले आहे. दोन्ही रेस्क्यू पथके, वन विभाग कर्मचारी आणि शिराळा येथील स्थानिक रेस्क्यू पथकाचे सर्व सदस्य वेगवेगळ्या तीन पथकांच्या माध्यमातून अत्याधुनिक ‘थर्मल ड्रोन’द्वारे बिबट्याचा शोध घेत आहेत.

मात्र, अद्यापही या बिबट्याचा ठोस मागमूस लागलेला नसल्याने परिसरात भीतीचे वातावरण कायम आहे. राजवीरवर ज्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला, त्या परिसरासह तडवळे, उपवळे व बिऊरच्या इतर परिसरात सहा पिंजरे लावण्यात आले आहेत.

त्याच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यासाठी वेगवेळ्या ठिकाणी सात कॅमेरे बसविण्यात आले आहेत. भक्ष्याच्या शोधात बिबट्या येईल म्हणून वनविभागाने सहा पिंजऱ्यांत बोकड ठेवले आहेत. त्यांच्या वासाने तो येण्याची शक्यता होती. तीन दिवस कर्मचारी विविध ठिकाणी तळ ठोकून आहेत. मात्र त्याने सर्वांना गुंगारा दिला आहे.

वन विभागाचे अधिकारी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या ‘थर्मल ड्रोन’ कॅमेऱ्याने त्याचा रात्री शोध घेत आहेत. यात वनक्षेत्रपाल रमेश कांबळे, वनपाल अनिल वाजे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, प्राणिमित्र प्रा. सुशीलकुमार गायकवाड, धीरज गायकवाड, रेस्क्यू पथकाचे युनूस मणेर, नामदेव शिद, संतोष कदम, गौरव गायकवाड, प्रतीक पोळ, पंकज कदम, तसेच कोल्हापूर रेस्क्यू टीमचे प्रदीप सुतार, अल्माटीन बांदी, रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट (पुणे) च्या अध्यक्ष नेहा पंचमिया यांच्या मार्गदर्शनाखाली निनाद ताह्मणकर, सागर शिंदे, अभिलाष बनसोडे हे सहभागी झाले आहेत.

पुणे येथील रेस्क्यू टीमने आज सायंकाळी सातपासून बिऊर येथील घटनास्थळी भेट देऊन त्या परिसराची माहिती घेतली. रात्री ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने शोध सुरू आहे. अत्याधुनिक ड्रोनद्वारे शोध ज्याद्वारे बिबट्याचा शोध घेतला जात आहे, त्या एका ‘थर्मल ड्रोन’ कॅमेऱ्याची किंमत साडेबारा लाख रुपये आहे.

असे सध्या ५ कॅमरे आहेत.

त्या कॅमेऱ्यात रात्रीच्या थंड वातावरणात उष्ण रक्ताचा सजीव प्राणी फिरत असेल, त्याच्या हालचाली दिसून येतात. याद्वारे बिऊर, उपवळे, तडवळे परिसर रात्रीचा पिंजून काढला जात आहे. मात्र बिबट्याचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही.

 

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!