April 23, 2026 9:20 pm

*मनोज जरांगेंच्या हत्येच्या कटाप्रकरणी अमोल खुणेला जामीन

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी केला होता. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटकही केली होती.त्यातील एका जणाला जामीन मिळाला आहे. अमोल खुणे हे मनोज जरांगेंचे जुने सहकारी होते. त्यांनीच आता जरांगेंवर गंभीर आरोप केले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

तीन महिन्यांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी जालना पोलिस अधीक्षकांना एक पत्र देऊन मनोज जरांगे पाटलांना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. याच दरम्यान, एक व्हिडीओ व्हायरल झाला. दादा गरुड नावाच्या व्यक्तीचा तो व्हिडीओ होता. त्यात तो धनंजय मुंडेंनी मनोज जरांगेंची सुपारी दिल्याचं सांगत असल्याचा दावा केला जात होता. त्यानंतर धनंजय मुंडेंचा सहकारी कांचन साळवीच्या माध्यमातून हे सगळं शिजत होतं आणि जरांगेंचा जुना सहकारी अमोल खुणे हादेखील त्यात सहभागी असल्याचा दावा करण्यात आलेला.

जालना पोलिसात साळवे, खुणे, गरुड या तिघांवर गुन्हा दाखल झाला होता. मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करत त्यांनीच आपली सुपारी दिल्याचं म्हटलं होतं. कशा पद्धतीने संपवण्याचा कट शिजला होता, हेही सांगितलेलं. अन्नामध्ये विष देऊन, बंदुकीच्या गोळीने किंवा गाडीने अपघात घडवून मारण्याचा कट रचला होता, त्यासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिल्याचंही जरांगे म्हणालेले.

यानंतर धनंजय मुंडे यांनी परळीत पत्रकार परिषद घेतली होती. आपण असं काहीही केलं नसल्याचं त्यांचं म्हणणं होतं. माझी नार्को टेस्ट करा, असं आव्हान त्यांनी जरांगेंना दिलं. जरांगेंनी आव्हान स्वीकारत पुढाकार घेऊन पोलिसांना तसं पत्रही दिलं. मात्र धनंजय मुंडे नार्को टेस्टसाठी कधी पुढे आलेच नाहीत आणि त्यावर भाष्यही केलं नाही. जरांगे पाटील मात्र वारंवार नार्को टेस्टसाठी आवाहन करत राहिले.

या प्रकरणी धनंजय मुंडेंवर कारवाई करावी, अशी मनोज जरांगेंची मागणी होती. परंतु पोलिसांनी त्यांना चौकशीलाही बोलावलं नव्हतं. त्यावर जरांगेंनी आरोप करत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे धनंजय मुंडेंनी चौकशीतून वाचण्यासाठी गळ घातल्याचं म्हटलं होतं.

अमोल खुणेंना जामीन

अमोल खुणे हे तीन महिन्यांनतर जामिनावर बाहेर आले आहेत. त्यांनी आता थेट जरांगे पाटलांवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलंय. ते म्हणाले की, जरांगे पाटील आणि माझी नार्को टेस्ट करा आणि कोणतीही चौकशी करा, मी तयार आहे. धनंजय मंडेंचा आणि माझा सीडीआरमध्ये संबंध आलेला नाही.. ते एसआयटी चौकशीमध्ये समोर येईल. पुढच्या दोन-तीन दिवसांमध्ये मोठा खुलासा करणार असल्याचंही खुणे यांनी म्हटलं.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!