April 20, 2026 4:25 am

*पुण्यात नवीन शासकीय विश्रामगृह

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

शहराचा वाढता विस्तार अन् सतत असणाऱ्या अति महत्त्वाच्या व्यक्तींचा (व्हीआयपी) वाढता राबता लक्षात घेता नवीन शासकीय विश्रामगृहाची आवश्यकता होती. हे लक्षात घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने लष्कर परिसरातील शासकीय विश्रामगृह क्रमांक २ (आयबी) ची जुनी इमारत पाडून तेथे अत्याधुनिक आणि सोयीसुविधांयुक्त नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे.

सुमारे ३० हजार चौरस फूट जागेवर सुमारे ३३ कोटी रुपये खर्चून नवीन इमारत बांधली जात आहे. यात ४८ कक्ष असून ते महत्त्वाच्या व्यक्तींपासून सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध राहणार आहेत. दीड वर्षात या इमारतीचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

पुण्यात सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे तीन विश्रामगृह आहेत. यात व्हीव्हीआयपी, ग्रीन बिल्डिंग व नवीन सर्किट हाऊसचा समावेश आहे. जिल्हाधिकारी निवासस्थानाच्या बाजूला ‘आयबी’चे विश्रामगृह होते. यात पूर्वी २६ कक्ष होते. जास्त कक्षाची वाढती मागणी व जीर्ण झालेली इमारत लक्षात घेऊन जुनी इमारत पाडण्यात आली. या ठिकाणी आता नवीन इमारतीचे काम सुरु झाले आहे.

नवीन इमारत पर्यावरणपूरक व दर्जेदार असेल. १८ महिन्यांत ती पूर्ण करण्याचे नियोजन आहे. येथील सर्व खोल्या वातानुकूलित आणि सोयीसुविधांयुक्त असतील. पार्किंगची पुरेशी व्यवस्था केली आहे.

– भरतकुमार बाविस्कर, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे

पुण्याचा विस्तार लक्षात घेता एका मोठ्या शासकीय विश्रामगृहाची गरज होती. ती लक्षात घेऊन पूर्वीच्या तुलनेत अधिक सुविधांयुक्त व मोठी इमारत बांधली जात आहे. यात ४८ कक्ष असल्याने महत्त्वाच्या व्यक्तींसह सामान्य नागरिकांची सोय होणार आहे.

– राजेंद्र रहाणे, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे

कुणासाठी उपलब्ध?

लोकप्रतिनिधी, न्यायाधीश, सचिव, आयुक्त, विविध आयोगांचे अध्यक्ष व सदस्य, शासकीय कामासाठी दौऱ्यावर असणारे अधिकारी, अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, अधिस्वीकृतीधारक पत्रकार, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारप्राप्त व्यक्ती, स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी व खासगी व्यक्ती.

 

असे असणार कक्ष

३० हजार चौरस फूट क्षेत्रामध्ये ४८ कक्ष

सर्व कक्ष वातानुकूलित

एका कक्षाची लांबी ४.५ मीटर तर रुंदी ५.५ मीटर, आलिशान बेडरूमसारखा कक्ष बेड, सोफा, टीव्ही युनिट, छोटा टेबल व ड्राय बाल्कनीचा कक्षात समावेश अशी असेल नवीन इमारत, नवीन इमारतीमध्ये स्टिल्ट, पार्किंगची सुविधा, दोन मजल्यांची इमारत.

प्रत्येक मजल्यावर २२ कक्ष

तळमजल्यावर अपंग व्यक्तींसाठी स्वतंत्र कक्ष, कॅन्टीन व वाहनचालकांसाठी डॉर्मिटोरीची विशेष व्यवस्था

कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र सेवक निवासस्थाने

भविष्यातील गरज ओळखून ३०० दुचाकी आणि १०३ चारचाकी वाहने उभी राहतील एवढी मोठी पार्किंग

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!