April 19, 2026 11:29 pm

*इमारतीची बांधकाम परवानगी पडताळणीसाठी नगररचना विभागाकडे

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

कल्याण – डोंबिवलीतील टेलकोसवाडीतील विपुल इमारतीसमोर मागील तीन ते चार महिन्यापासून एक बांधकाम सुरू आहे. या बांधकामाच्या विरूध्द एका तक्रारदाराने पालिकेत तक्रार केली होती. पालिकेच्या ह प्रभागाने या बांधकामधारकाला नोटीस बजावली. त्यानंतर संबंधित विकासक पालिका सुनावणीला उपस्थिती राहून नगररचना विभागाने दिलेल्या बांधकाम परवानगीची कागदपत्रे सादर केली. या कागदपत्रांची सत्यता पडताळणीसाठी ह प्रभागाने विकासकाची कागदपत्रे नगररचना विभागाकडे पाठविली आहेत.

नगररचना विभागाकडून परवानगीच्या कागदपत्रांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य कार्यवाहीचा निर्णय घेण्यात येईल, असे ह प्रभागाच्या अधिकाऱ्याने याप्रकरणातील तक्रारदार विनोद जोशी यांना कळविले आहे. डोंबिवली पश्चिमेत बेसुमार बेकायदा झाली आहेत. डोंबिवली पश्चिमेतील टेलकोसवाडी भागात विपुल इमारतीसमोर एक तीन माळ्याचे बांधकाम सुरू असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते विनोद जोशी यांनी पालिका प्रशासनाकडे केली होती.

 

या तक्रारीची दखल घेऊन ह प्रभागाचे प्रभारी साहाय्यक आयुक्त भूषण कोकणे यांनी टेलकोसवाडीतील संबंधित विकासकाला इमारतीची बांधकाम परवानगीची कागदपत्रे दाखल करण्याचे आदेश दिले होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या सुनावणीला या बांधकामाचे विकासक प्रफल्ल गोरे उपस्थित होते. त्यांनी बांधकामाविषयीची कागदपत्रे सादर केली. या कागदपत्रांची अधिकृतता तपासणीसाठी ही परवानगीची कागदपत्रे पालिकेच्या साहाय्यक संचालक नगररचना यांच्याकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आली आहेत. या पडताळणीनंंतर आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे ह प्रभाग अधिकाऱ्याने तक्रारदाराला कळविले आहे.

या इमारतीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी विनोद आणि कल्पेश जोशी हे जोशी बंधू बेमुदत उपोषणाला बसले आहेत. नगररचना विभागाकडून या बांंधकामाच्या परवानगीची सत्यता पडताळणी झाल्यानंतर आणि तसा अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर पुढील योग्य ती कार्यवाही केली जाईल. त्यामुळे आपण आझाद मैदान येथील बेमुदत उपोषण मागे घ्यावे, असे ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी उपोषणकर्त्यांना कळविले आहे. शिव आदित्य रिॲलिटीचे संचालक प्रफुल्ल गोरे ही इमारत उभारत आहेत. चंद्रशेखर भोसले या इमारतीचे वास्तुविशारद आहेत, असे पालिकेच्या कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे.

सन २०२३- २०२४ मध्ये या इमारतीला नगररचना विभागाने बांधकाम परवानगी दिली आहे. या इमारतीचे प्रत्यक्ष काम गेल्या चार ते पाच महिन्यापासून सुरू आहे. बांधकाम परवानगी घेतल्यानंंतर तीन वर्षांनी या इमारतीची उभारणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या इमारतीसाठी विकासकाने मुदतवाढ घेतली आहे का, बांधकामात बदल केले असतील तर सुधारित बांधकाम परवानगी घेतली आहे का, असे प्रश्न उपस्थित करून ते कागदपत्र देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. महसूल विभागाच्या अकृषिक विभागाकडेही तक्रारदाराने याप्रकरणी तक्रार केली आहे.

वारंवार मागणी करूनही ह प्रभागाकडून आपणास ही मुदतवाढ, सुधारित बांधकाम परवानगी उपलब्ध करून दिली जात नाही, असे तक्रारदार जोशी यांनी सांगितले. यासंदर्भात आपण कोकण विभाग नगररचना, संचालक, नगररचना, पुणे यांच्याकडे दाद मागणार आहोत, असे तक्रारदार जोशी यांनी सांगितले.

 

दरम्यान, विकासक प्रफुल्ल गोरे हे डोंबिवली ६५ महारेरा बनावट इमारत प्रकरणातील गुन्ह्यात सहभागी आहेत. कुंभारखाणपाडा येथील खाडी किनारच्या बेकायदा गृहसंकुलात ते सहभागी आहेत. त्यांची शिवमंदिर रस्त्यावरील एक बेकायदा इमारत पालिकेने काही वर्षापूर्वी भुईसपाट केली होती.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!