April 19, 2026 9:51 pm

*स्पार्क संस्थेत लताताई वाघमारे यांचा आदर्श वाढदिवस

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

स्पार्क सोशल एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी येथे लताताई वाघमारे यांनी आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत अत्यंत साधेपणाने आणि आनंदी वातावरणात साजरा केला. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मुकुंद काळे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी संस्थेच्या वसतिगृहातील मुले तसेच अभ्यासासाठी सेंटरमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना लताताईंनी खाऊ वाटप केले. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

कार्यक्रमाला मान्यवर म्हणून मनोज लेले सर, जयंत परांजपे, सुधीर ओक, अनिल साळुंके, मयुरी कलबुर्गे, चिन्मय तसेच लताताईंचे मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

यावेळी लताताई वाघमारे यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांच्या शिक्षणाविषयी, आवडी-निवडींबाबत तसेच भविष्यातील स्वप्नांबाबत संवाद साधला. त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले.

संस्थेच्या वतीने लताताई वाघमारे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आणि त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करण्यात आले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!