April 20, 2026 4:28 am

अजितदादांच्या हातातील घड्याळावरुन पटली मृतदेहाची ओळख

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं आज सकाळी अपघाती निधन झालं. आज ते बारामती दौऱ्यावर होते. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचारासाठी ते बारामतीच्या दौऱ्यावर जात होते. दरम्यान, सकाळी लँडिंगवेळी त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. अजित पवारांसह एकूण 5 जणांचे दुर्देवी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी पसरताच नेते मंडळी तसेच कार्यकर्त्यांना अश्रु अनावर झाले. अजित पवार यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी ठरली.

विमान क्रॅश होताच मोठा आवाज झाला. स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच बचावकार्याला सुरूवात केली. दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी अपघात नेमका कसा घडला? अजित पवार यांच्या मृतदेहाची ओळख नेमकी कशी पटली? याची माहिती दिली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार ज्या विमानात होते, ते विमान आकाशात घिरट्या घालत होतं. त्यानंतर विमान जोरात कोसळलं. विमानाचा भयंकर स्फोट झाला. विमानाचे अक्षरश: तुकडे झाले. तसेच विमानातील काही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या मृतदेहाची ओळख त्यांच्या घड्याळावरून झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या हातातील घड्याळ त्यांची शेवटची ओळख असल्याचं सिद्ध झाले आहे. यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, विमानातील एकूण 5 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली. दरम्यान, यावरून या अपघाताच्या भीषणतेची कल्पना येते.

घटनास्थळावरून काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये विमानाचे तुकडे, विमानाची सीट, काही अर्धवट जळालेले कागदपत्रे आणि डायरी सापडली आहे. घटनास्थळावरून आणखी काही सापडतं का? याचा शोध सुरू आहे.

अपघात नेमका कसा घडला?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात बारामती एअरपोर्टपासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावर झाला असल्याची माहिती आहे. विमानात ऐनवेळी बिघाड झाले. बिघाडामुळे विमान धावपट्टीवर लँड होऊ शकले नाही. दरम्यान, एअरपोर्टपासून पुढे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या उतारावरील जमिनीवर जाऊन हे विमान कोसळले. विमान ज्या भागात कोसळले, तो भाग खोल होता. परिसरात झाडं झुडपं आणि उस शेती आहे. तसेच शेजारी काही घरांची वस्ती देखील आहे. दरम्यान, अपघात होताच विमानाचा अक्षरश: कोळसा झाला आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे, विमानातील कागदपत्रे सहिसलामत राहिली आहेत. तर काही कागदपत्रे अर्धवट जळालेली आहेत. विमानाचे तुकडे झाले असून, कागदपत्रे बाहेर फेकली गेली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!