April 19, 2026 10:02 pm

‘मुंब्रा को हरा कर देंगे…’ म्हणणाऱ्या नगरसेविकेला मराठी अभिनेत्याने लगावला टोला

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

महानगरपालिकेच्या निवडणुकीत सहर शेख यांचा मुंब्रा येथून विजय झाला. पण, त्या विजयानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३० मधून असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षातर्फे सहार शेख ही तरुणी निवडून आली. निवडणुकीतल्या त्या विजयानंतर भाषण करताना सहर शेख यांनी “कैसा हराया, अभी हम लोगों को मुंब्रा को पूरा हरा कर देना है”, असं वक्तव्य करीत आव्हाड यांना डिवचलं होतं.

 

सहर शेख यांनी केलेल्या त्या वक्तव्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. अर्थात या वक्तव्यानंतर सहर यांना अनेकांकडून टीकाही सहन करावी लागली. सहर यांच्या प्रक्षोभक वक्तव्यानंतरच्या निर्माण झालेल्या असंतोषामुळे सहर यांना त्याबद्दल माफीसुद्धा मागावी लागली. पण, सहर यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल अजूनही प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अशातच यावर एका मराठी अभिनेत्याने खोचकपणे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

मराठी अभिनेता अभिजीत केळकरनं सहर यांच्या विधानावर त्याच्या अनोख्या शैलीत उत्तर दिलं आहे. अभिजीत हा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करीत असतो. तसेच अनेकदा तो राजकीय मतंसुद्धा व्यक्त करताना दिसतो. अशातच त्यानं सहर यांच्या विधानावर उत्तर देत एक व्हिडीओ शेअर केला आहे.

 

या व्हिडीओमध्ये अभिनेता झाडे लावताना दिसत आहे. सहर यांच्या विधानाची नक्कल करीत तो म्हणतो, “हरा कर दिया ना… अरे, मी तर म्हणतो फक्त मुंब्राच नव्हे, तर पूर्ण हिंदुस्थान हिरवा करून टाका. काय ताई… नाय कळलं… अहो, आमच्यात पण हिरवं करतात; पण ते झाडे लावून. झाडे लावा, झाडे जगवा! वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे…” तर या व्हिडीओच्या कॅप्शनमध्येही त्यानं ‘फक्त मुंब्रा नको, अख्खा हिंदुस्थान आणि पृथ्वी ‘हिरवी’गार करून टाका… झाडे लावा; झाडे जगवा…’, असं म्हटलं आहे.

 

दरम्यान, हा व्हिडीओखालील कमेंट्समध्ये अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अंकिता वालावलकर, साक्षी गांधीसह अनेक कलाकारांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “छान उत्तर दिलंस”, “दादा खूप छान”, “एकदम बरोबर” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

 

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!