April 21, 2026 1:24 pm

घरी ठेवायचा, नाहीतर शोमधून बाहेर काढेन:- रितेश देशमुख

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर अनुश्री माने, रुचिता जामदार यांच्यासह सोनाली राऊतची देखील शाळा घेतली जाणार आहे. या आठवड्यात कॅप्टन्सी उमेदवारीसाठी घरात ‘शेणाचं दार अन् मेणाचं दार’ हा टास्क खेळवण्यात आला होता. या टास्कमध्ये ‘पॉवर Key’ जिंकणाऱ्या सदस्यांना कॅप्टन्सी उमेदवारी मिळणार होती.

 

सोनाली राऊतला या टास्कमध्ये शेणाच्या घरात पाठवण्यात आलं होतं. यामुळे नियमांनुसार तिच्यावरही प्रतीकात्मक शेण टाकलं जाणार होतं, हा टास्क घरातील अन्य सदस्यांनी पूर्ण केला. पण, सोनाली राऊतने हा टास्क करण्यास स्पष्ट नकार दिला. ती शेवटपर्यंत शेणाच्या घरात गेली नाही. यामुळे खेळही बराच वेळ थांबला होता. याच पार्श्वभूमीवर बिग बॉसने तिला पुढच्या आठवड्यासाठी थेट नॉमिनेट केलं.

 

सोनालीची ही भूमिका प्रेक्षकांना पटली नव्हती. नियम सर्वांना सारखे असतात असंही म्हटलं गेलं. याचसंदर्भात तिला भाऊच्या धक्क्यावर सुद्धा जाब विचारण्यात आला. टास्क खेळण्यास नकार दिल्याची चूक या सुपर मॉडेलला चांगलीच महागात पडली आहे.

 

रितेश भाऊच्या धक्क्यावर तिला म्हणाला, “सोनाली तुम्ही ठरवलं की त्या शेणाच्या दाराखाली तुम्ही उभ्या राहणार नाही. मग, तुम्ही का आलात इथे? टास्क खेळण्यासाठी आलात ना?”

 

यावर सोनाली म्हणते, “पण मला जे वाटलं…” ती बोलत असताना रितेशने तिला मध्येच थांबवलं आणि म्हणाला, “ओ जरा एक मिनिट…हा Attitude तुमच्या घरी ठेवायचा. या घरात नाही दाखवायचा…इथे सगळे सारखे आहेत. यावेळेला फक्त नॉमिनेट केलंय. पुढच्या वेळेस घराच्या बाहेर काढेन.

 

टास्क खेळण्यास नकार दिल्याने रितेश देशमुखने सोनालीला भाऊच्या धक्क्यावर चांगलंच झापलं आहे. इतकंच नव्हे तर यापुढे असं केल्यास थेट घराच्या बाहेर काढेन असा इशाराही भाऊंनी तिला दिला आहे. आता यापुढे सोनालीचा रुबाब असाच राहणार की, तिच्या वागणुकीत बदल होणार हे येत्या आठवड्यात स्पष्ट होईल.

 

दरम्यान, या आठवड्यात सोनाली सेफ असली तरीही पुढच्या आठवड्यासाठी ती नॉमिनेट झाली आहे. आता सोनालीचा पुढील गेमप्लॅन काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. सध्या तरी ती कोणत्याही ग्रुपचा भाग नाहीये. सोनाली अशाचप्रकारे एकटी खेळणार की विशाल कोटियनची टोळी किंवा राकेश बापटचा ग्रुप जॉईन करणार हे लवकरच स्पष्ट होईल.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!