April 20, 2026 4:27 am

प्रभाग ३८ मधील EVM मतफरकावर राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे महानगरपालिका निवडणूक 2026 मधील प्रभाग क्रमांक ३८ मध्ये मतदान प्रक्रियेत ई.व्ही.एम. मतांमध्ये १,०११ मतांचा फरक आढळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रभाग ३८(अ) ओबीसी महिला गटाच्या वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रा. दिपाली दिलीप सूर्यवंशी जेठे यांच्या वतीने प्रतिनिधी प्रा. आनंद जेठे तसेच भारतीय मानवतावादी पार्टीचे नाशिक जिल्हाध्यक्ष शरद धनराव यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे संयुक्तपणे लेखी तक्रार दाखल केली आहे.

 

तक्रारीनुसार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी लेखी पत्र देऊन प्रभाग ३८ मध्ये एकूण ७९,८२६ मतदान झाल्याचे नमूद केले होते.

 

दरम्यान, १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी झाल्यानंतर सुद्धा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी लेखी पत्र दिले असून, त्यामध्ये ई.व्ही.एम. मशीनमध्ये ७८,७१९ मतदान झाल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही आकड्यांमध्ये १,०११ मतांचा फरक दिसून आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

 

या मतमोजणी प्रक्रियेत भारतीय मानवतावादी पार्टीचे शरद धनराव हे उमेदवार प्रा. दिपाली जेठे यांचे मतमोजणी प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. तसेच प्रा. आनंद जेठे यांनी देखील मतमोजणीदरम्यान मतफरकावर तत्काळ आक्षेप घेतला, मात्र त्यानंतरही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

 

तक्रारदारांच्या मते, या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संशय व्यक्त केला जात आहे.

 

या संयुक्त तक्रारीमध्ये यापुढील निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, तसेच ई.व्ही.एम. संदर्भात निर्माण झालेल्या त्रुटींवर राज्य निवडणूक आयोगाने लेखी खुलासा द्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!