April 20, 2026 12:25 pm

दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला पहाटेपासूनच गर्दी

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने यंदाचा गणेश जन्म सोहळा माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच आज बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. विनायक अवतार असलेला हा गणेशजन्म सोहळा यंदा देखील सुवर्णपाळण्यामध्ये दुपारी १२ वाजता होणार आहे. यंदा स्वराभिषेक, गणेशयाग, श्री गणेश जागर, नगरप्रदक्षिणा असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत

संपूर्ण मंदिराला आकर्षक पुष्पसजावट व विद्युतरोषणाई करण्यात येणार आहे. आज पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक झाले याशिवाय गणेशसुक्त अभिषेक देखील मंदिरात सुरु असणार आहे तसेच सकाळी ६ ते १० आणि दुपारी १.३० ते सायंकाळी ५ यावेळेत गणेश याग होणार आहे

 

मुख्य गणेशजन्म सोहळ्याला दुपारी १२ वाजता सुरुवात होणार आहे. यामध्ये पारंपरिक वेशात महिला सहभागी होणार आहेत. जन्माच्या वेळी पुष्पवृष्टी देखील करण्यात येणार आहे. यावेळी गणेशाची मंगल आरती होईल. नगरप्रदक्षिणा मिरवणूक सायंकाळी ६ वाजता दगडूशेठ गणपती मंदिरापासून निघणार आहे. त्यानंतर रात्री ८ वाजता श्रीगणेशाची मंगलआरती होईल. रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आला आहे. गणेशजन्माच्या दिवशी पहाटे ३ वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुले राहणार आहे. तरी भाविकांनी विविध कार्यक्रमांत सहभागी होत दर्शनाचा लाभ घ्यावा, असे ट्रस्टतर्फे कळविण्यात आले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!