April 20, 2026 9:09 am

महाराणा प्रताप चौक येथे चेंबर दुरुस्तीचे काम पूर्ण

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

आंबेगाव बुद्रुक परिसरात नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत नगरसेविका सौ. प्रतिभाताई चोरघे यांच्या वतीने आणखी एक महत्त्वाचे काम मार्गी लावण्यात आले आहे. नागरिकांच्या मागणीनुसार व संभाव्य अपघाताची शक्यता लक्षात घेऊन महाराणा प्रताप चौक, भारती विद्यापीठ परिसरात, महाराणा प्रताप मित्र मंडळ गणपती मंदिरासमोर असलेल्या धोकादायक चेंबरची दुरुस्ती करण्यात आली आहे.

सदर ठिकाणी चेंबर खराब अवस्थेत असून चुकून अपघात घडण्याची दाट शक्यता होती. ही बाब स्थानिक नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीने दखल घेत चेंबर दुरुस्तीचे काम पूर्ण करून सुरक्षितता सुनिश्चित करण्यात आली.

या कामामुळे वाहनचालक, पादचारी, विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांचा धोका टळला असून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
“नागरिकांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद देऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने कामे करणारे नेतृत्व मिळाले आहे,” अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.

नगरसेविका प्रतिभाताई चोरघे यांच्या माध्यमातून परिसरातील लहान-मोठ्या नागरी समस्यांवर सातत्याने लक्ष देत त्या तातडीने सोडवण्याचे काम सुरू असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!