April 22, 2026 3:42 pm

नागरिकांच्या मागणीला रोहिदास बाप्पुंचा तात्काळ प्रतिसाद

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

जैन मंदिर, साईनगर लेन नं. ४ समोरील रस्ता रात्री २ ते ५ वाजेपर्यंत करून तयार; बापूंच्या कामाची ओळख ठळक

पुणे | आंबेगाव बुद्रुक :
नागरिकांच्या मागणीला केवळ आश्वासन न देता तातडीने कृतीत उतरवणे हीच आपल्या कामाची ओळख असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करत रोहिदास बापू चोरघे यांनी जैन मंदिर, साईनगर लेन नंबर ४ समोरील गल्लीत रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून दिले.

या परिसरातील नागरिकांनी दिवसा वाहतूक व दैनंदिन कामकाजात अडथळा होऊ नये, यासाठी दुपारऐवजी रस्त्याचे काम रात्री करण्याची मागणी केली होती. नागरिकांच्या या मागणीची तात्काळ दखल घेत बापूंच्या मार्गदर्शनाखाली रात्री २ ते पहाटे ५ वाजेपर्यंत रस्त्याचे काम सलग सुरू ठेवून रस्ता पूर्ण करण्यात आला.

काम सुरू करण्यापूर्वी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आणि कमीत कमी वेळेत दर्जेदार काम पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. रात्रीच्या वेळी काम करून नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, याची विशेष काळजी घेण्यात आली.

या तातडीच्या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत,
“नागरिकांच्या मागणीनुसार वेळ बदलून रस्ता करून देणं हीच बापूंच्या कामाची खरी ओळख आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!