April 23, 2026 3:33 pm

टाटा मोटर्स कर्मचाऱ्यांच्या श्रमदानातून जिल्हा परिषद शेनवड शाळेचे रंगकाम

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

टाटा व्हॉलेंटिअरिंग वीक अंतर्गत सामाजिक उपक्रम

टाटा उद्योग समूह हा देशातील सामाजिक जबाबदारीची भक्कम परंपरा जपणारा अग्रगण्य उद्योग समूह म्हणून ओळखला जातो. या समूहातील प्रमुख कंपनी टाटा मोटर्समध्ये कार्यरत असलेला प्रत्येक कर्मचारी समाजसेवेचा एक महत्त्वाचा घटक आहे, या जाणिवेतून कंपनीमार्फत सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. याच सामाजिक बांधिलकीतून टाटा व्हॉलेंटिअरिंग वीक अंतर्गत टाटा मोटर्सच्या कन्स्ट्रक्शन, प्लांट इंजिनीअरिंग व पर्यावरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून जिल्हा परिषद शेनवड शाळेचे रंगकाम केले.
मागील वर्षी हारपूड येथील जिल्हा परिषद शाळेचे रंगकाम यशस्वीरीत्या केल्यानंतर, यंदा शेनवड गावचे सरपंच श्री. संतोष भूरुक यांच्या विनंतीवरून राजगड परिसरातील दुर्गम भागात असलेल्या जिल्हा परिषद शेनवड शाळेच्या दोन वर्गखोल्यांचे नूतनीकरण करण्यात आले. टाटा मोटर्सच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः रंगसाहित्य आणून संपूर्ण दिवस श्रमदान करत वर्गखोल्यांना आकर्षक व स्वच्छ स्वरूप दिले.
या उपक्रमाअंतर्गत शाळेची परिसर स्वच्छता करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांसाठी खाऊचे वाटपही करण्यात आले. स्वच्छ व सुंदर वर्गखोल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाबाबत सकारात्मकता निर्माण होण्यास मदत होईल, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
या सामाजिक उपक्रमासाठी शाळेचे शिक्षक जानकर सर यांनी मोलाचे सहकार्य केले, तर उपक्रमाचे संपूर्ण नियोजन व समन्वय अभियंता संतोष मोरे यांनी यशस्वीपणे पार पाडले. टाटा मोटर्सच्या या उपक्रमामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांच्या शैक्षणिक वातावरणाच्या सुधारण्यात मोलाचा वाटा उचलला जात असून, स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!