April 23, 2026 11:56 pm

इतिहासतज्ञ डॉ रामचंद्र मोरवंचीकर यांचं निधन

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

प्रख्यात इतिहासकार तसेच लेखक डॉ. रामचंद्र मोरवंचीकर यांचं शनिवारी रात्री अल्पशा आजारानं निधन झालं. रविवारी दुपारी त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केली. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात इतिहास विभाग प्रमुख तसंच पर्यटन प्रशासन विभागाचे संचालक म्हणून काम पाहिलं. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर तब्बल २०० संशोधनात्मक निबंध, तर १६ ग्रंथ त्यांच्या नावावर नोंद आहेत. त्यांचा ‘प्रतिष्ठान ते पैठण’ हा ग्रंथ चांगलाच चर्चेत राहिला.

 

इतिहास विषयावर जागतिक स्तरावर ओळख – इतिहासाचा अभ्यास करणारे एक अभ्यासू व्यक्ती म्हणून मोरवंचीकर यांची आगळीवेगळी ओळख जागतिक स्तरावर निर्माण केली होती. मराठवाडा त्या भोवतीची संस्कृती, इतिहास, नद्या यांच्यावर केलेला अभ्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडणारे म्हणून त्यांचं नाव इतिहास तज्ञांमध्ये घेतलं जातं. पैठण येथील उत्खननात त्यांनी महत्त्वपूर्ण काम केलं होतं. वेरूळ – औरंगाबाद महोत्सवाचे कार्यकारी अध्यक्ष, भारतीय जलसंस्कृती मंडळाचे संस्थापक उपाध्यक्ष म्हणून त्यांनी मोलाचं योगदान दिलं होतं. विविध समितींच्या माध्यमातून इतिहास आणि संस्कृती या विषयावर त्यांचं काम प्रभावी ठरलं. विद्यापीठात अनेक वर्ष अध्यापन केल्यानंतर त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं “जीवन साधना” पुरस्कारानं देखील त्यांना सन्मानित केलं होतं.

इतिहासावर टाकला प्रकाश –

लिखाणातून इतिहासाच्या वेगवेगळ्या पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला. जलसंस्कृतीची मांडणी त्यांनी प्रभावीपणे मांडत, सातवाहन काळाचं मूलभूत संशोधन त्यांनी केलं. अश्मक – मूलक, पेतनिक मौर्य सत्ता आणि सातवाहन यातील वेगवेगळ्या राजे यांचा अभ्यास करणारा त्यांचा “प्रतिष्ठान ते पैठण” हा ग्रंथ खूप प्रभावी मानला जातो. इतिहासाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात चाळीस वर्ष काम केलं. या काळात त्यांनी पैठणमध्ये उत्खनन केलं, दौलताबाद किल्ल्यात एवढ्या उंचावर मोगल काळातील स्थापत्य अभियांत्रिकी कशी विकसित होते त्याच्यावर त्यांनी अभ्यास केला होता. विशेषतः पैठण, दौलताबाद, अजिंठा लेणी या ऐतिहासिक वारसावर अभ्यासपूर्ण लिखाण करून नवीन पिढीला काहीतरी शिकायला मिळावं असं कार्य त्यांनी केलं. इतिहासाच्या वेगवेगळ्या बाजूंवर त्यांनी आवर्जून प्रकाश टाकत केलेले लेखन प्रेरणादायी आणि अभ्यासू मानलं जातं.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!