April 23, 2026 11:58 pm

राष्ट्रवादीचा करिश्मा की डाव भाजपचाच?

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

राज्यातील महापालिका निवडणुकांची राज्य निवडणूक आयोगाने घोषणा केली. त्यानुसार, 15 जानेवारी 2026 ला मतदान प्रक्रिया पार पडली आणि 16 जानेवारी 2026 रोजी निकाल लागला. 29 महापालिकांपैकी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची राज्यभर चर्चा रंगताना दिसली. भाजपासोबत मिळून सत्तास्थापन केल्यापासून अजित पवार गट आणि शरद पवारांची एनसीपी एकमेकांविरोधात लढताना दिसली. मात्र, पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही एनसीपी एकत्र निवडणुका लढताना दिसल्या. महापालिकेच्या निवडणुकीत राज्यातील संपूर्ण राजकीय समीकरणे बदलल्याचे बघायला मिळाले. कुठे युती तर कुठे आघाडी तर थेट काही ठिकाणी विरोधात निवडणुका लढण्यात आल्या. महापालिकेत बिनविरोध निवडणुकांमध्ये अगोदरच भाजपासह महायुतीने आघाडी मिळवली. भाजपला बिनविरोध निवडणुकीत पिंपरी चिंचवड महापालिकेत यश मिळाले.

 

प्रभाग क्रमांक 15 मध्ये चार वॉर्ड होते. अ, ब, क आणि ड. प्रभाग क्रमांक 15 अ मधून राष्ट्रवादीचे राजू मिसाळ विजयी झाले होते. प्भाजपच्या शैलजा मोरे विजयी झाल्या होत्या. क मधून भाजपच्या शर्मिला बाबर विजयी झाल्या होत्या. तर प्रभाग क्रमांक 15 ड मधून शिवसेनेचे अमित गावडे विजयी त्यावेळी विजयी झाले होते. वॉर्ड क्रमांक 15 मध्ये एकून 35 हजार 209 मतदार आहेत. यंदाही चुरसी लढत या प्रभागात झाली.

 

मागच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 16 मध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने वर्चस्व बघायला मिळाले. चारपैकी 2 भाजपा आणि दोन राष्ट्रवादी अशी स्थिती होती. मात्र, या निवडणुकीत संपूर्ण गणिते बदलली आहेत. नेहरूनगर, विठ्ठलनगर, मगर स्टेडियम, टाटा मोटर्स, अमृतेश्वर कॉलनी आणि यशवंत नगर, गुरूव्दासा चाैक समावेश आहे. बदललेल्या समीकरणांचा कोणाला फायदा होतो, हे स्पष्ट होईल.

 

वॉर्ड क्रमांक 17 ची यमुनानगर ते फुलेनगर या परिसरातपर्यंत व्याप्ती आहे. 2017 साली वॉर्ड क्रमांक 17 कमध्ये भाजपचे उमेदवार नामदेव ढाके जिंकले होते. वॉर्ड क्रमांक 17 च्या लढतीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. वॉर्ड क्रमांक 18 ची व्याप्ती मनपा भवन, मोरवाडी, ज्ञानेश्वरनगर, अजमेरा कॉलनी, विशाल थिएटर, गांधीनगर, खराळवाडी या भागात वॉर्ड क्रमांक 18 ची व्याप्ती आहे. एकूण लोकसंख्या 38244 आहे तर त्यामध्ये अनुसुचित जाती 7999 आणि अनुसुचित जमाती 383 आहेत.

 

प्रभाग क्रमांक 19 मध्ये एकूण लोकसंख्या 36 हजार 588 आहे. यामध्ये अनुसूचित जातीचे 11 हजार 482 मतदार आहेत. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 17 एवढी आहे. प्रभाग क्रमांक 20 मध्ये काळभोर नगर बजाज कंपनी, थरमॅक्स कंपनी, खंडोबा मंदिर, रामनगर, विद्यानगर, दत्तनगरपर्यंत आहे. अगदी काही वेळातच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!