April 24, 2026 1:15 am

पुण्यात गावाकडनं आणले मतदार

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

राज्यातील 29 महापालिकांसाठी आज महानगरांमध्ये मतदानाला सकाळपासूनच सुरुवात झाली आहे. मात्र, बोगस मतदान, मतदान यंत्रातील बिघाड, बोटावरील शाई पुसणे, दुसऱ्याच व्यक्तीने मतदान करुन जाणे यांसह अनेक गैरप्रकार समोर येत आहेत. त्यावरुन, आता विरोधी पक्षातील नेत्यांनी ओरड सुरू केली असून स्थानिक मतदान केंद्रावरील लोकही व्हिडिओच्या माध्यमातून भूमिका मांडत आहेत. त्यातच, पुणे (Pune), सोलापूर, मुंबई आणि जालन्यासह काही ठिकाणी बोगस मतदार पकडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सोलापुरात कर्नाटकमधून गाड्या भरुन मतदार (Voting) आणल्याचा दावा समाजवादी पक्षाकडून करण्यात आला आहे.

 

पुण्यातील प्रभाग क्रमांक 41 चे उमेदवार प्रमोद नाना भानगिरे यांनी स्वतः महादेव वाडी उंड्री या परिसरात एका खासगी गाडीतून ग्रामीण भागातून काही लोकांना मतदानासाठी आणण्यात आल्याचा आरोप केला आहे. नाना भानगिरे हे शिवसेना पुणे शहरप्रमुख आहेत, त्यांनी स्वत: प्रभाग क्रमांक 41 महादेववाडी उंड्री या प्रभागातील उंड्री चौक येथे बोगस मतदान पकडले आहे आहेत. तसेच, संबंधितांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केलीय.

जालन्यात बोगस मतदार ताब्यात

जालन्यातील प्रभाग क्रमांक 9 मधील डबल जिन परिसरामध्ये एका मतदाराने बोगस मतदान केल्याचा संशय मतदान प्रतिनिधींनी केला आहे. या संशयावरून संबंधित मतदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं. संशयित मतदाराची सध्या पोलिसांकडून विचारपूस केली जात आहे, खात्री झाल्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याचं पोलिसांची सांगितल. संशयित मतदाराने दुसऱ्या नावावर मतदान केल्याचा आरोप मतदान प्रतिनिधींनी केला असून मधुकर देठे असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित मतदाराचे नाव आहे. दरम्यान संशयित मतदाराने कोणत्या नावाने मतदान केलं आहे, याची खात्री संबंधित निवडणूक अधिकाऱ्याकडून घेत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे.

कर्नाटकातून गाड्या

भरुन

आणले मतदार

सोलापुरातील प्रभाग 14 मध्ये एमआयएम आणि समाजवादी पक्षात वाद झाल्याचं पाहायला मिळालं. एमआयएमकडून बोगस मतदानासाठी कर्नाटकातून गाड्या आणल्याचा आरोप समाजवादी पक्षाकडून करण्यात आला आहे. जवळपास दोन हजार मतदार बोगस मतदानासाठी आणल्याचा आरोप समाजवादीकडून करण्यात आला. मात्र, हे बोगस मतदार समाजवादी पक्षाकडून पकडल्यानंतर बोगस मतदार माफी मागून निघून गेल्याचा दावाही समाजवादीचे उमेदवार रियाज खरादी यांनी केला आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!