April 23, 2026 6:29 pm

EVM व VVPAT मशीनद्वारेच होणार मतदान; प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व सुरक्षित

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी मतदान प्रक्रिया पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) आणि VVPAT (Voter Verifiable Paper Audit Trail) यांच्या माध्यमातून पार पडणार आहे. मतदान प्रक्रियेत पारदर्शकता, विश्वासार्हता आणि सुरक्षितता राखण्यासाठी निवडणूक आयोगाने ही यंत्रणा वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

EVM मशीनमध्ये तीन प्रमुख युनिट्स असतात. त्यामध्ये कंट्रोल युनिट (CU), बॅलेट युनिट (BU) आणि VVPAT युनिट यांचा समावेश आहे. मतदान केंद्रावर सर्वप्रथम मतदान अधिकारी कंट्रोल युनिटद्वारे मशीन सक्रिय करतात. त्यानंतर मतदार बॅलेट युनिटवर आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील निळ्या रंगाचे बटण दाबतो.

बटण दाबताच संबंधित उमेदवाराच्या बाजूला लाल दिवा (LED) पेटतो आणि बीप असा आवाज येतो, ज्यामुळे मत नोंद झाल्याची खात्री मिळते. याच वेळी VVPAT मशीनद्वारे उमेदवाराचे नाव व चिन्ह असलेली कागदी स्लिप सुमारे ७ सेकंदांसाठी मतदाराला दिसते. ही स्लिप मतदाराला हातात मिळत नाही, तर ती थेट VVPAT च्या सीलबंद बॉक्समध्ये जमा होते.

निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की EVM मशीन इंटरनेट किंवा कोणत्याही नेटवर्कशी जोडलेली नसते, त्यामुळे हॅकिंग किंवा बाह्य हस्तक्षेपाची शक्यता नाही. मतदानापूर्वी मॉक पोल, तसेच मतदानानंतर सीलिंग आणि सुरक्षित साठवणूक अशा सर्व टप्प्यांवर काटेकोर नियमांचे पालन केले जाते.

VVPAT प्रणालीमुळे मतदाराला आपले मत योग्य उमेदवारालाच दिले गेले आहे याची प्रत्यक्ष खात्री मिळते, त्यामुळे मतदान प्रक्रियेवरील विश्वास अधिक मजबूत झाला आहे. निवडणूक प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता निर्भयपणे मतदान करून लोकशाहीचा हक्क बजावावा, असे आवाहन केले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!