April 23, 2026 9:17 pm

निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पोलिस भरारी पथक सज्ज

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे:- पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५-२०२६ अनुषंगाने मा. वरिष्ठांनी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात संतर्कपणे पेट्रोलिंग करुन आचार संहितेचा भंग होत असल्यास त्याच्याविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत आदेशित केले होते.

 

सदर आदेशाप्रमाणे येवलेवाडी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात वेगवेगळया टिम तयार करुन शोध घेत असताना दि.१३/०१/२०२६ रोजी येवलेवाडी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामध्ये रात्रौ २१/०० वा चे सुमारास बधे स्टील, खडीमशीन चौक येथे आचार संहितेचा भंग होत असल्याबाबत येवलेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर येथे माहिती प्राप्त झाली. तेव्हा सदर माहिती पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५-२०२६ अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या भरारी पथकास (एफ.एस.टी) यांना माहिती मिळालेल्या ठिकाणी येवलेवाडी पोलीस स्टेशन कडील पथक रवाना झाले होते. प्राप्त माहितीनुसार बधे स्टील, खडीमशीन चौक या ठिकाणी टोयोटो इनोव्हा गाडी नंबर एम.एच-१२ आर.एल. ३००९ व ब्रिझा गाडी नंबर एम. एच-१२ क्यु.सी-३००९ लॉक स्थितीमध्ये अशी वाहने मिळून आली असता भरारी पथकाने (एफ.एस.टी) दोन्ही या संशयित गाडीची कसून तपासणी केली असता टोयोटो इनोव्हा गाडी नंबर एम.एच-१२ आर. एल. ३००९ या गाडीमध्ये ५०० रुपयांचे ०२ बंडल त्याची एकूण रक्कम १ लाख रुपये मिळून आली, तसेच लॉक असलेली संशयित ब्रिझा गाडी नंबर एम.एच-१२ क्यु.सी-३००९ ही आज दि. १४/०१/२०२६ रोजी येवलेवाडी पोलीस स्टेशन येथे भरारी पथकाने (एफ.एस.टी) यांनी उघडुन पाहणी केली असता त्यात १) एक खाकी बॉक्स त्यामध्ये २) मतदारांची यादि ३) पाढरे २२५ रिकामे / कोरे लिफाफे व खाकी रंगाचे ८० रिकामे / कोरे लिफाफे ४) लहान वहया २१ ५) मोठ्या वहया ८६) पॅप्लेट १२ यावस्तु मिळुन आल्या आहेत.

 

सदरबाबत पंचनामा कारवाई करण्यात आली आहे. तसेच सदरबाबत भरारी पथकाने (एफ.एस.टी) यांचे मार्फत निवडणुक अधिकारी यांना कळवुन पुढील कार्यवाहि करण्यात येत आहे.

 

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग श्री मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ-०५ श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्रीमती नम्रता देसाई, मा. सहायक पोलीस आयुक्त लोणी काळभोर विभाग श्रीमती अनुराधा उदमले व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येवलेवाडी पोलीस स्टेशन श्री. अमर काळंगे, यांचे मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे (एफ.एस.टी) यांनी केलेली आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!