April 23, 2026 9:17 pm

पास घरी राहिला म्हणून चिमुकल्याला हायवेवर उतरवले 

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पास घरी राहिला म्हणून चिमुकल्याला हायवेवर उतरवल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूर मंगळवेढा एसटी बसमध्ये  घडल्याचे समोर आले आहे. हाचिमुरडा कंडक्टरला वारंवार आपल्या ‘पप्पांना फोन करा…’ ते पैसे देतील, अशी विनवणी करीत असतानाही या कंडक्टरने या लहानग्याला दप्तरासह हायवेवर वाहनांच्या गर्दीत उतरविल्याची संतापजनक घटना घडली आहे.

 

सदर प्रकारामुळे पालक, ग्रामस्थ आणि सर्वसामान्य नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) येथील प्रथमेश राहुल पाटील हा सातवीतील विद्यार्थी रोज शिक्षणासाठी मंगळवेढ्याला ये-जा करतो. शनिवारी नेहमीप्रमाणे सायंकाळी पाच वाजता तो मंगळवेढा आगाराची सोलापूर–मंगळवेढा (बस क्रमांक ९४०५) या एसटीने प्रवास करत होता. ब्रह्मपुरीपासून काही अंतरावर बस आल्यानंतर वाहक तिकीट काढण्यासाठी आला. यावेळी प्रथमेशने बॅगमध्ये पास शोधला असता, तो चुकून घरी राहिल्याचे लक्षात आले. घाबरलेल्या प्रथमेशने वडिलांना फोन करण्याची विनंती केली.’पप्पा पैसे देतील,’ असे तो वारंवार सांगत होता. मात्र त्या निरागस शब्दांनाही वाहकाने किंमत दिली नाही. क्षणाचाही विचार न करता, सायंकाळच्या वेळी, भरधाव वाहनांच्या गर्दीत बसचा दरवाजा उघडून त्या चिमुकल्याला थेट महामार्गावर उतरवण्यात आले.

 

अचानक रस्त्यावर सोडल्यामुळे प्रथमेश गोंधळून गेला. डोळ्यांत पाणी, मनात भीती आणि आजूबाजूला धावणारी वाहने…अखेर त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला हात दाखवला. त्या व्यक्तीच्या मदतीने तो कसेबसे घरी पोहोचला. घरी आल्यानंतर त्याच्या थरथरत्या आवाजात घडलेला प्रकार ऐकून कुटुंबीय हादरून गेले. या घटनेनंतर पालकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. “पास विसरणे ही चूक असू शकते; पण त्यासाठी लहानग्या विद्यार्थ्याला महामार्गावर उतरवणे म्हणजे त्याच्या जीवाशी खेळ आहे,” असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणी पालक राहुल पाटील यांनी परिवहन मंत्री, परिवहन आयुक्त,जिल्हा आगार प्रमुख व तालुका आगार व्यवस्थापकांकडे लेखी तक्रार दाखल करून संबंधित वाहकावर निलंबनाची कारवाईची मागणी केली आहे. सरकार मोफत पास देते, पण एसटीत माणुसकी कुठे हरवली?, असा सवाल उपस्थित होत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!