April 23, 2026 5:30 pm

विज्ञान प्रदर्शनातून जबाबदार शास्त्रज्ञ घडविण्याचे कार्य मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचे मत

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे : अशा प्रकारची विज्ञान प्रदर्शने विद्यार्थ्यांमेध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासोबतच त्यांना जबाबदार शास्त्रज्ञ व अभियंते बनविण्यात मोलाची भूमिका बजावतात. समाजासाठी अर्थपूर्ण योगदान देणारी पिढी घडविण्यासाठी अनुभवाधारित शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, नावीन्यपूर्णता आणि संशोधन वृत्ती वाढविणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी केले.

 

 

 

शिक्षण विभाग, जिल्हा परिषद पुणे, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ, विज्ञान अध्यापक संघ पुणे आणि जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ वे जिल्हास्तरीय बाल विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी जी एच रायसोनी इंटरनॅशनल स्कील टेक युनिवर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर. डी. खराडकर, माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, संजय नाईकडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, डॉ. एच. आर. कुलकर्णी, रायसोनी काॅलेजचे उपसंचालक डॉ. प्रवीण जांगडे , मार्केटिंग विभाग प्रमुख अमिता सिंग जी एच रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका दिवेना शार्दुल, विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष रोहिदास एलाड उपशिक्षणाधिकारी राजेंद्र मालुसरे, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव शिवाजी कांबळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

सीईओ गजानन पाटील यांनी सांगितले की, जिल्हा व राष्ट्रीय स्तरावर सादर होणारे विज्ञान प्रकल्प हे प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये असलेली प्रचंड क्षमता दर्शवतात. प्रकल्पांमध्ये पारदर्शकता व मौलिकतेवर भर देण्याची गरज आहे. जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांच्या करिअर वाटचाली अत्यंत मौल्यवान असून त्यांना सातत्याने प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. बारामती व आळंदी परिसरात सायन्स पार्क उभारण्यात येत असून, भविष्यात तेथे विज्ञान प्रदर्शने आयोजित करण्यात येतील. जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी नासासारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पोहोचत असून, मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते.

रायसोनी एज्युकेशनचे चेअरमन श्री. सुनील रायसोनी, कार्यकारी संचालक श्री. श्रेयश रायसोनी आणि संचालिका पलक रायसोनी यांनी या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!