September 4, 2026 9:23 am

ईद मिरवणुकीमुळे पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

नाना पेठ ते शुक्रवार पेठ मार्गावर वाहतूक वळविणार; १०० मीटर परिसरात वाहन पार्किंगला बंदी

पुणे : ईद-ए-मिलाद निमित्त आज, बुधवार (२६ ऑगस्ट) पुणे शहरात मिरवणूक काढण्यात येणार असल्याने वाहतूक पोलिसांकडून शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. नाना पेठ परिसरातून सुरू होणारी ही मिरवणूक विविध प्रमुख मार्गांवरून जात शुक्रवार पेठेतील सिटी जामा मशीद येथे समाप्त होणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी संबंधित मार्गांचा वापर टाळून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

मिरवणुकीचा मार्ग

  • मिरवणुकीला मनुशाह मस्जिद, ४८२ नानापेठ येथून सुरुवात होणार.
  • संत कबीर चौक, ए.डी. कॅम्प चौक, भारत सिनेमा, पद्मजी पोलीस चौकी चौक, निशांत सिनेमा या मार्गावरून मिरवणूक पुढे जाणार.
  • त्यानंतर चुडामन तालीम, मुफ्ती फौज चौक, सरदार पटेल रोड, कुरेशी मस्जिद, जान मोहम्मद स्ट्रीट, बाबाजान दर्गाह परिसरातून मिरवणूक जाणार.
  • सेंटर स्ट्रीट रोड, एम.जी. रोड, महमद रफी चौक, कोहीनूर चौक, महावीर चौक, क्वार्टर गेट, नाना चावडी चौक आदी मार्गांचा समावेश आहे.
  • मिरवणुकीची सांगता सिटी जामा मशीद, शुक्रवार पेठ येथे होणार आहे.

१०० मीटर परिसरात पार्किंगला बंदी

मिरवणुकीच्या मुख्य मार्गासह त्याला जोडणाऱ्या उपरस्त्यांवर आणि गल्लीच्या तोंडापासून आतील बाजूस १०० मीटर अंतरापर्यंत वाहन पार्क करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मिरवणूक सुरू असताना मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनतळास मनाई राहणार आहे.

वाहतूक कोणत्या मार्गाने वळविणार?

  • रास्ता पेठ पॉवर हाऊस ते संत कबीर चौक या मार्गावरील वाहतूक समर्थ पोलिस स्टेशन आणि क्वार्टर गेट मार्गे वळविण्यात येणार.
  • नाना पेठेतून लक्ष्मी रोडकडे जाणारी वाहने नाना चावडी चौकातून रास्ता पेठ-पॉवर हाऊस मार्गे वळविण्यात येणार.
  • पद्मजी पोलीस चौकी परिसरात मिरवणूक पोहोचल्यानंतर क्वार्टर गेटकडून येणारी वाहतूक संत कबीर चौकाकडे वळविण्यात येणार.
  • ए.डी. कॅम्प चौक ते पद्मजी चौक या मार्गावरील वाहतूक परिस्थितीनुसार क्वार्टर गेट आणि जुना मोटार स्टँडच्या दिशेने वळविण्यात येणार.
  • चुडामन तालीम चौकाकडे जाणारी वाहने पुलगेट किंवा जुना मोटार स्टँड मार्गे सोडण्यात येणार.
  • एम.जी. रोडकडे जाणारी काही वाहतूक खाणे मारुती चौकाच्या दिशेने वळविण्यात येणार.
  • व्होल्गा चौकाकडून महमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक ईस्ट स्ट्रीट रोडमार्गे इंदिरा गांधी चौकाकडे वळविण्यात येणार.

परिस्थितीनुसार बदल शक्य

मिरवणुकीच्या प्रत्यक्ष हालचालीदरम्यान वाहतूक परिस्थितीनुसार मार्गांमध्ये आवश्यक ते बदल करण्यात येऊ शकतात. मिरवणूक पुढे गेल्यानंतर मागील रस्ते टप्प्याटप्प्याने वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

पुणेकरांना आवाहन

मध्यवर्ती पुणे, नाना पेठ, कॅम्प, भवानी पेठ आणि आसपासच्या भागात जाणाऱ्या नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करून घराबाहेर पडावे. शक्य असल्यास मिरवणुकीचा मार्ग टाळून पर्यायी रस्त्यांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!