September 7, 2026 2:54 pm

नवनाथ देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुरेश फडतरे

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

सचिवपदी महादेव फडतरे, तर खजिनदारपदी सोनबा फडतरे यांची बिनविरोध निवड

गाराडे, ता. ११ : पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथील जागृत देवस्थान श्री कानिफनाथ गडावरील श्री नवनाथ देवस्थान पंच कमिटी ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुरेश फडतरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच सचिवपदी महादेव फडतरे आणि खजिनदारपदी सोनबा फडतरे यांची निवड झाली. विश्वस्त मंडळाच्या कार्यकारिणीची मुदत पूर्ण झाल्यानंतर झालेल्या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

श्री नवनाथ देवस्थान पंच कमिटी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या कार्यकारिणीची तीन वर्षांची मुदत संपल्यामुळे नवीन कार्यकारिणी निवडण्यासाठी विश्वस्त मंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार तसेच विश्वस्त पदांसाठी निवड प्रक्रिया पार पडली. सर्व पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोध झाल्याने देवस्थानच्या पुढील कामकाजासाठी नवीन कार्यकारिणीची वाट मोकळी झाली आहे.

नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे

  • अध्यक्ष : सुरेश फडतरे
  • उपाध्यक्ष : दीपक फडतरे
  • सचिव : महादेव फडतरे
  • खजिनदार : सोनबा फडतरे
  • विश्वस्त : ज्ञानोबा फडतरे
  • विश्वस्त : जयवंत फडतरे
  • विश्वस्त : नागेश फडतरे
  • विश्वस्त : शिवाजी जगदाळे
  • विश्वस्त : प्रकाश (भाऊ) फडतरे
  • विश्वस्त : प्रकाश (आप्पा) फडतरे
  • विश्वस्त : नितीन फडतरे
  • विश्वस्त : मंगेश फडतरे
  • विश्वस्त : रमेश फडतरे

देवस्थानच्या विकासावर भर

श्री क्षेत्र कानिफनाथ गड हे संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, देवस्थान परिसराचा विकास करणे आणि धार्मिक परंपरा जपणे याला नव्या कार्यकारिणीकडून प्राधान्य दिले जाणार आहे.

देवस्थानमध्ये येणाऱ्या भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, परिसरातील आवश्यक विकासकामे मार्गी लागावीत आणि देवस्थानच्या व्यवस्थापनात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी भूमिका नूतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

भाविकांच्या सोयी-सुविधा वाढविण्यासोबतच श्री क्षेत्र कानिफनाथ गडाच्या विकासासाठी आणि देवस्थानच्या लौकिकाला साजेसे काम करण्यासाठी नवीन विश्वस्त मंडळ कटिबद्ध राहील, असे नूतन अध्यक्ष सुरेश फडतरे, सचिव महादेव फडतरे आणि खजिनदार सोनबा फडतरे यांनी सांगितले.

नवीन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल देवस्थान परिसरातील भाविक, ग्रामस्थ आणि हितचिंतकांकडून नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या कार्यकाळात देवस्थानच्या विकासाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!