September 7, 2026 7:43 pm

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त प्रतिकूल प्रतिष्ठान व दलित विकास आघाडीचा स्तुत्य उपक्रम; ३० गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

वाई, प्रतिनिधी : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधत प्रतिकूल प्रतिष्ठान व दलित विकास आघाडी, वाई यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमातून तब्बल ३० गरजू रुग्णांवर सांगली येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली.

या सामाजिक उपक्रमासाठी डॉ. विठ्ठल भोईटे आणि प्रतिकूल प्रतिष्ठानचे संस्थापक संजय सकटे यांनी विशेष पुढाकार घेतला. वाई ग्रामीण रुग्णालयाच्या सहकार्याने रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्यानंतर पात्र रुग्णांना पुढील उपचारासाठी सांगली येथे पाठविण्यात आले.

शस्त्रक्रियेपूर्वी सर्व रुग्णांची डोळ्यांची सखोल तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर मधुमेह, रक्तदाब तसेच इतर आवश्यक वैद्यकीय चाचण्या करून शस्त्रक्रियेसाठी योग्य रुग्णांची निवड करण्यात आली. रुग्णांना उपचारादरम्यान कोणताही आर्थिक भार पडू नये, यासाठी प्रवास, जेवण, शस्त्रक्रिया तसेच परतीच्या प्रवासाची संपूर्ण व्यवस्था विनामूल्य करण्यात आली.

या उपक्रमामुळे अनेक गरजू नागरिकांना नवदृष्टी मिळण्यास मदत झाली असून, सामाजिक बांधिलकी जपत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना कृतीतून अभिवादन करण्यात आले.

या उपक्रमासाठी वाई ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सौरभ निंबाळकर, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच प्रतिकूल प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण संकपाळ, दिलीप कांबळे, शिवाजी भिसे, राजू तावरे, सोमनाथ आवळे, आरती कांबळे, कुणाल सकटे, दिलीप जाधव आणि सर्व स्वयंसेवकांनी उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

प्रतिकूल प्रतिष्ठान व दलित विकास आघाडी यांच्या वतीने भविष्यातही आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक न्याय या क्षेत्रात अशाच लोकाभिमुख उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. उपस्थित नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत आयोजकांचे आभार मानले.b

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!