पुणे | प्रतिनिधी
कल्याण–माळशेज घाट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील करंजाळे (ता. जुन्नर) परिसरात रस्ता खचल्याची गंभीर घटना घडल्याने प्रशासनाने तातडीची पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर माळशेजघाट मार्गे अहिल्यानगर तसेच पुणे येथून मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश जारी केले असून, नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, करंजाळे गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचा काही भाग खचल्यामुळे वाहतुकीस गंभीर धोका निर्माण झाला आहे. मुसळधार पावसामुळे या परिसरातील परिस्थिती अधिकच बिकट झाली असून, कोणताही अपघात अथवा जीवितहानी होऊ नये, तसेच वाहतूक कोंडी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, आळेफाटा – नारायणगाव – खेड – चाकण – तळेगाव एमआयडीसी – लोणावळा – खोपोली – मुंबई हा पर्यायी मार्ग वाहनांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. मुंबईकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी याच मार्गाचा वापर करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
वाहतूक विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. रस्त्याची पाहणी करून दुरुस्तीचे काम हाती घेण्याची प्रक्रिया सुरू असून, रस्ता सुरक्षित झाल्यानंतरच वाहतूक पूर्ववत करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान, माळशेजघाट मार्गाचा वापर करणारे प्रवासी, मालवाहतूकदार आणि खासगी वाहनचालकांनी अनावश्यक प्रवास टाळावा तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. घाट परिसरात अद्यापही पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून जारी होणाऱ्या अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असेही प्रशासनाने म्हटले आहे.
महत्त्वाचे मुद्दे
करंजाळे येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर रस्ता खचला.
माळशेजघाट मार्गे मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश जारी केले.
पर्यायी मार्ग : आळेफाटा – नारायणगाव – खेड – चाकण – तळेगाव एमआयडीसी – लोणावळा – खोपोली – मुंबई.
रस्ता सुरक्षित होईपर्यंत वाहतूक बंदच राहणार; नागरिकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन.

Post Views: 7