June 5, 2026 8:27 pm

अंबाजोगाईत बहीण-भावाची सीबीआयकडून चौकशी

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

नीट यूजी प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी सीबीआय अंबाजोगाईपर्यंत पोहचली असून, गुरुवारी दुपारी शहरातील बहिणभावाची व एका पालकाची चौकशी करण्यात आली.सीबीआयने त्यांचे मोबाईल, सिमकार्ड व इतर महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.

नीटची तयारी करण्यासाठी हे दोन विद्यार्थी लातुरात राहत होते. पथक सकाळी अंबाजोगाई शहरात दाखल झाले. शहरातील स्थानिक पोलिसांनाही फारशी भणक लागू न देता सीबीआयने थेट संशयित विद्यार्थ्यांचा शोध घेत कारवाई सुरू केली. या पथकाने दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन एका अज्ञात ठिकाणी त्यांची दोन तास कसून चौकशी केली.

चौकशी दरम्यान तपास यंत्रणेने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलत दोन्ही विद्यार्थ्यांचे मोबाईल फोन आणि कार्ड आपल्या ताब्यात घेतले आहेत. या दोन्ही संशयित विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच गैरमार्गान किंवा आर्थिक देवाणघेवाण करून निटचा पेपर मिळवला असल्याचा दाट संशय सीबीआयला आहे. ताब्यात घेतलेल्या मोबाईल आणि मेमरी कार्डमधील डिजिटल डेटा, चॅट्स आणि कॉल्सच्या माध्यमातून या संशयाची शहानिशा केली जात आहे.

अंबाजोगाईमध्ये सीबीआयने चौकशी केलेले विद्यार्थी हे बहिणभाऊ असल्याची माहिती आहे. यातील बहिणीने नीट परीक्षा रिपीट केली आहे. त्यांची आई शिक्षिका असून त्यांची देखील चौकशी करण्यात आली असल्याची माहिती आहे. सीबीआयच्या पथकाने अत्यंत गुप्तपणे ही सगळी कारवाई केली. यासाठी स्थानिकच्या एका शासकीय कर्मचाऱ्याची देखील सीबीआयने मदत घेतल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!