June 5, 2026 8:29 pm

संतोष देशमुख हत्या प्रकरण न्यायाधीशांसमोरच आरोपीने कॉलर उडवली!

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचा माज गुरुवारी दस्तुरखुद्द न्यायालयाने पाहिला. सुनावणीच्या वेळेस न्यायाधीशांसमोरच आरोपीने उद्धट वर्तन केले. न्यायालयाचा आदर न राखता आरोपीने व्हिडीओ कॉन्फरन्सैंपैपैगच्या स्क्रीनसमोरच आपली कॉलर उडवली.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानूष हत्या प्रकरणाची आज सुनावणी झाली. ऑनलाईन सुनावणीच्या वेळेस न्यायाधीशांसमोर आरोपींनी स्क्रीनसमोर आपली कॉलर उडवल्याने न्यायालयामध्ये संताप व्यक्त करण्यात आला. आज सुनावणीच्या वेळी आरोपी जयराम चाटे याने दाखल केलेल्या जामीन अर्जावर सरकारी पक्षाच्या वतीने न्यायालयात आपले म्हणणे मांडले. दुसरीकडे आरापीच्या वकिलाने न्यायालयीन प्रक्रियेत पुन्हा एकदा लॅपटॉपचा जुनाच मुद्दा पुढे करत वेळकाढूपणा करण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात माहिती देताना सरकारी पक्षाचे वकील अॅड.बाळासाहेब कोल्हे यांनी सांगितले की, आरोपी विष्णू चाटे याच्याकडून न्यायालयात अर्ज सादर करण्यात येणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात न्यायालयात कुठलाही अर्ज सादर करण्यात आला नाही. पुढील सुनावणी आता 4 जून रोजी आहे.

नराधम आरोपींना त्यांच्या कृत्याचा कसलाही पश्चाताप नाही. त्यांनी आज न्यायालयासमोर उद्धट वागणूक केली. न्यायाधीशांसह आम्ही स्वतः सर्वांनी पाहिली हे आरोपी किती र्निढावलेले आहेत. हे सिद्ध करण्यासाठी न्यायाधीशांनी या गोष्टी अधिकृतपणे चार्जशिट आणि कोर्टाच्या रेकॉर्डवर नमूद कराव्यात अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!