June 5, 2026 7:54 am

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघाताची घटना घडली.भरधाव कार थेट लोखंडी रेलिंगमध्ये घुसली. या भीषण अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली आहे. सध्या वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आले. तर दोन्ही मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर काही वेळापूर्वी भीषण अपघात झाला. मुंबईवरून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर अपघात झाला. बऊर गावाजवळ भरधाव कार एक्स्प्रेस वेवरील लोखंडी सुरक्षा रेलिंगमध्ये घुसली. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली. ही धडक इतकी जोरात होती की कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे.

या अपघातात कारमधील तिघांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर उर्वरित १ जण जखमी झाला आहे. अपघातानंतर कारमध्ये सर्व जण अडकून पडले होते. मदत यंत्रणेकडून तिघांनाही कारचा पत्रा कापून बाहेर काढण्यात आले आहे. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात तर जखमी व्यक्तीला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

या अपघातानंतर एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली आहे. घटनास्थळी आयआरबी यंत्रणा, महामार्ग पोलीसअपघातग्रस्त वाहन महामार्गावरून हटवून वाहतूक सुरळीत करत आहेत. अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. जखमीची प्रकृती गंभीर आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!