June 5, 2026 9:15 am

उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मुंबईजवळील उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक ४ मजली इमारतत पत्त्यासारखी कोसळली. सुदैवाने उल्हासनगर पालिकेनं आधीच ही इमारत धोकादायक असल्याचं जाहीर केलं होतं.

त्यामुळे इमारत रिकामी करण्यात आली होती. नेमकं इमारत खाली केल्यानंतरच कोसळण्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरमध्ये ४ मजली इमारत अचानक कोसळल्याने एकच खळबळ उडून पळापळ झाली. उल्हासनगरच्या कॅप नंबर तीन भागातील हिरा घाट परिसरात लेक व्ह्यूव ही चार मजली इमारत होती. ही इमारत धोकादायक झाल्याने महापालिका प्रशासनानं ती सुरक्षेच्या दृष्टीने खाली केली होती.

आज इथल्या रहिवाशांनी पुनर्बांधणी करण्यासाठी इमारत निष्काशीत केली. त्यावेळी ही ४ मजली इमारत एका पत्याच्या बंगल्यासारखी अवघ्या काही सेकंदामध्ये जमीनदोस्त झाली. मात्र, हे करत असतांना त्यांनी आजूबाजूला ग्रीन नेट लावणे गरजेचे होते, मात्र ते न केल्याने उडालेल्या प्रचंड धुळीमुळे नागरिकांना याचा मोठा त्रास झाला.

दरम्यान, इमारत कोसळत असताना रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण होऊन एकच पळापळ झाली. रस्त्यावरून जाणारे वाहनधारक या घटनेमुळे पुरते हैराण झाले. इमारत जेव्हा कोसळत होती, त्यावेळी रस्त्यावरून वाहनं जात होती. इमारत कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात परिसरात धूळ उडाली. रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात धूळ साचली होती. सुदैवाने या दुर्घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!