June 5, 2026 11:35 am

गुजरातच्या आंब्यांची धूम; बाजारात गोडवा वाढला

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

बीड शहरातील आंबाबाजारात सध्या गुजरातच्या धरमपूर बाजारपेठेतून मोठ्या प्रमाणात केशर आंब्याची आवक होत आहे.याशिवाय कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू राज्यांतूनही विविध जातींचे आंबे बाजारात दाखल होत आहेत.

काही दिवसांपूर्वीपर्यंत रत्नागिरी आणि देवगडच्या हापूस आंब्याची मोठी आवक होती. मात्र आता हापूसचे प्रमाण कमी होत असून, त्याची जागा गुजरातच्या केशर आंब्याने घेतल्याचे दिसून येत आहे.

व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, बीड बाजारात दररोज ६० ते ७० टन विविध जातींच्या आंब्यांची आवक होत आहे. गुजरात केशर आंब्याला प्रतिकिलो १५० ते १६० रुपये दर मिळत असून, स्थानिक केशर १२५ ते १५० रुपये, बंगळुरी हापूस १०० ते १५० रुपये, तर लालबाग आणि बदाम जातीचे आंबे ५० ते ७० रुपयांदरम्यान विकले जात आहेत.

यंदा नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात सलग फुलोरा आल्याने स्थानिक केशर आंब्याचे उत्पादन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळाले नाही.

मात्र काही शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन केल्याने त्यांचा केशर आंबा बाजारात चांगल्या दराने विकला जात आहे.

नेकनूरचा ‘हूर’ आणि धाराशिव जिल्ह्यातील वाशी भागातील ‘रत्ना’ आंब्यालाही हौशी ग्राहकांकडून मागणी वाढत आहे. मात्र यंदा हूर आंब्याची आवक कमी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

बीड शहरात आंब्याचे सुमारे १५ ठोक व्यापारी आणि १०० हून अधिक किरकोळ विक्रेते कार्यरत आहेत. आंब्याच्या हंगामामुळे वाहतूक, विक्री, वर्गीकरण आणि पॅकिंग अशा विविध कामांतून २०० ते ३०० लोकांना रोजगार उपलब्ध होत असल्याचे चित्र आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!