June 5, 2026 3:59 pm

जी एच रायसोनी काॅलज आॅफ इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंटतर्फे ५ व्या काउन्सिलिंग बॅचचा प्रमाणपत्र देऊन सन्मान

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे: जी एच रायसोनी काॅलेज आॅफ इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट, पुणे आणि पीअर काऊन्सिलर क्लबच्या सहकार्याने पीअर काउन्सिलिंगच्या ५ व्या बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे आयोजन केले. एकूण २६ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हे विद्यार्थी कॅम्पसमधील त्यांच्या समवयस्कांसाठी मानसिक आणि भावनिक आरोग्याचे आधारस्तंभ म्हणून काम करण्यास अधिकृतपणे पात्र ठरले आहेत. समुपदेशन मानसशास्त्रज्ञ, सुरभी प्रणव यांनी १०० तासांचा प्रशिक्षण कार्यक्रम घेतला.

हा अनोखा पीअर काउन्सिलिंग अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या जीवनातील अनुभवांना सामोरे जाण्यास आणि समाजातील त्यांची वैयक्तिक भूमिका समजून घेण्यास मदत करतो. हा अभ्यासक्रम प्रामुख्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करतो, जेणेकरून आरोग्यासाठी एक सर्वांगीण दृष्टिकोन विकसित करता येईल. भावनिक लवचिकता म्हणजे तणाव आणि सामाजिक दबावांचे व्यवस्थापन करणे, संवाद कौशल्ये मजबूत करण्यासाठी सक्रिय श्रवण आणि सहानुभूतीपूर्ण संवादावर भर दिला जातो.

उत्तीर्ण विद्यार्थी विनीत रामटेके, ओम शुक्ला, सृष्टी चौकर, मोहित मुझोटे आणि युक्ती शेट्टी यांनी प्रशिक्षण अभ्यासक्रमादरम्यानचा आपला वैयक्तिक प्रवास आणि परिवर्तनकारी अनुभव सांगितले.

उपस्थितांना संबोधित करताना, जी. एच. रायसोनी काॅलेज आॅफ इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंटचे कॅम्पस संचालक डॉ. आर. डी. खराडकर म्हणाले की, मानसिक आरोग्य प्रणालीला पाठिंबा देण्यासाठी संस्था वचनबद्ध आहे. शैक्षणिक उत्कृष्टता हा विद्यार्थ्याच्या प्रवासाचा केवळ एक पैलू आहे, मानसिक आणि भावनिक लवचिकताच त्यांना खऱ्या जगासाठी सुसज्ज करते. या काउन्सिलिंग कार्यक्रमाद्वारे आपल्या युवकांना सक्षम करून, आम्ही एक सहानुभूतीपूर्ण कॅम्पस परिसंस्था तयार करत आहोत.

प्रमुख पाहुण्या रसिका. एम यांनी आपले मौल्यवान विचार मांडले. त्या म्हणाल्या की, सहानुभूती हा मानवी संबंधांचा गाभा आहे. समुपदेशन आणि कौन्सिलिंग पद्धत सर्वांगीण वैयक्तिक आणि जीवन विकासात एक अपरिहार्य भूमिका बजावते.

रायसोनी काॅलेजचे प्रभारी संचालक डॉ. एन. बी. हुल्ले, इंजिनिअरिंग प्रथम वर्षाच्या अधिष्ठाता डॉ. वंदना धुरेजा हे कार्यक्रमाला उपस्थित होते. विद्यार्थिनी जानवी सोनीने आभार प्रदर्शन केले.

रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्ष श्री. सुनील रायसोनी, कार्यकारी संचालक श्री. श्रेयस रायसोनी, कॅम्पस संचालक डॉ. आर. डी. खराडकर आणि रायसोनी काॅलेज पुणेचे प्रभारी संचालक श्री. एन. बी. हुल्ले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 

 

 

 

 

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!