June 5, 2026 6:25 pm

खडकी बाजारात भरदिवसा गोळीबार!

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पूर्ववैमनस्यातून दोघांवर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना खडकी बाजार परिसरात शुक्रवारी सायंकाळी घडली. यानंतर आरोपींनी परिसरात पिस्तूल उगारत दहशत माजविली, खडकी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सुदर्शन अडसूळ (२५, रा.गवळवाडा, खडकी बाजार) आणि रचिन्मय ( २५) या दोघांना अटक केली.

आकाश संजय वाघमारे ( २४, रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, महादेववाडी, खडकी) याने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघमारे आणि आरोपींमध्ये वाद झाले होते. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती. पोलिसांकडे दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी आरोपी आणि साथीदार फिर्यादीवर दबाब आणून त्याला धमकावत होते.

शुक्रवारी सायंकाळी पावणेआठच्या सुमारास वाघमारे आणि त्याचा मित्र दुचाकीवरुन खडकीतील राजीव गांधीनगर परिसरात आले. त्यावेळी आरोपी अडसूळ आणि त्याचा साथीदार चिन्मय त्यांच्या मागोमाग आले. आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. वाघमारे आणि त्याचा मित्र हे चांदणे टोळीतील आहेत. या दोघांना गोळ्या घाल, असे सांगून अडसूळने चिन्मयच्या कंबरेत खोचलेले पिस्तूल बाहेर काढले.

वाघमारे आणि त्याच्या मित्रावर पिस्तूल रोखले. पिस्तुलाचा चाप ओढून गोळी झाडली. त्यानंतर आरोपींनी पिस्तूल उगारून दहशत माजविले. सगळ्यांचा हिशेब चुकता करू, अशी धमकी देऊन आरोपी पसार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपींना रात्री उशीरा अटक करण्यात आली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!