May 15, 2026 10:22 pm

उंड्री-मोहम्मदवाडी परिसरातील ‘२४/७ पाणी पुरवठा प्रकल्पा’ला गती

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे, दि. १५ मे २०२६ : मोहम्मदवाडी-उंड्री व एनआयबीएम परिसरातील नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाला आता मोठा दिलासा मिळणार आहे. ‘२४/७ पाणी पुरवठा प्रकल्पा’ अंतर्गत उभारण्यात आलेल्या नव्या पाण्याच्या टाक्यांचे लोकार्पण मा. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या शुभहस्ते रविवार, दि. १७ मे रोजी दुपारी १ वाजता घुले चौक, दोराबजी मॉलजवळ, उंड्री येथे संपन्न होणार आहे.

या लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा मा. महापौर मंजूषा नागपुरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन घेतला. कार्यक्रमस्थळी सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी करत त्यांनी नियोजन, नागरिकांच्या सुविधा, सुरक्षा व्यवस्था तसेच कार्यक्रमाच्या तयारीबाबत सूचना दिल्या.

यावेळी मा. विधानपरिषद आमदार Yogesh Tilekar, मा. सभागृह नेते गणेश बिडकर, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

‘२४/७ पाणी पुरवठा प्रकल्पा’मुळे मोहम्मदवाडी, उंड्री आणि एनआयबीएम परिसरातील नागरिकांना नियमित, शुद्ध व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाई, कमी दाबाने होणारा पुरवठा आणि अनियमित वितरणामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. नव्या पाण्याच्या टाक्यांमुळे या भागातील पाणी व्यवस्थेला बळकटी मिळणार असून भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊनही हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

लोकार्पण सोहळ्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू असून नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पाचे स्वागत करत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींप्रती समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!