May 15, 2026 8:49 pm

पलूसच्या दत्तनगरमध्ये रात्रीच्या अंधारात नेमकं काय सुरू होतं?

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पलूस शहरातील दत्तनगरपरिसरात पाणीपुरवठा करणारी जुनी पाईपलाईन बदलण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून नगरपरिषद कर्मचारी रात्री उशिरापर्यंत मेहनत घेत आहेत.

नागरिकांचा पाणीपुरवठा खंडित होऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांनी अक्षरशः अंधाराशी झुंज देत मोटारसायकलच्या लाईटच्या उजेडात काम सुरू ठेवले.

पलूस शहरासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून दत्तनगर येथील बाबा हॉटेल ते कार्यालय परिसरापर्यंत ग्रामपंचायत काळातील जुनी पाईपलाईन बदलून त्या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सकाळीनियमित पाणीपुरवठा झाल्यानंतर खुदाई व पाईपलाईन बदलण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. काम सुरू असताना अंधार वाढत गेला, मात्र नागरिकांना दुम्रया दिवशी पाणीपुरवठा सुरळीत मिळावा यासाठी कर्मचाऱ्यांनी काम थांबवले नाही.

पुरेशा प्रकाशाची सुविधा नसल्याने मोटारसायकलींच्या लाईटचा वापर करून खुदाई, पाईप जोडणी आणि जॉ ईंट मारण्याचे काम सुरू ठेवण्यात आले. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कामामुळे नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या जिद्दीचे कौतुक होत आहे. गेल्या आठवड्यात टाकी स्वच्छतेच्या कामासाठी सलग पाच दिवस पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यामुळे पुन्हा नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागू नये, यासाठी प्रशासन आणि कर्मचाऱ्यांनी कामे वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!