May 15, 2026 8:47 pm

मध्यरात्रीच्या ‘हिट अँड रन’मध्ये २ सुरक्षारक्षकांचा करुण अंत

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

खामगाव म्हणजे सामाजिक, राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेले शहर. खामगाव शहर व तालुक्यातील गुन्हेगारी घटनांचे प्रमाण जास्त आहे. दुसरीकडे जवळून जाणारा राष्ट्रीय महामार्ग, विविध शहरांकडे जाणारे महामार्ग, यांमुळे खामगाव परिसरात वाहन अपघातांचे प्रमाणदेखील वाढले आहे.

अशा या खामगाव शहरात गुरुवारी मध्यरात्री भीषण अपघाताची नोंद झाली. भरधाव कारने चिरडल्याने दोन सुरक्षारक्षकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

ही थरारक घटना परिसरातील ‘सीसीटीव्ही’मध्ये कैद झाली असून त्या आधारे खामगाव शहर पोलिसांनी दोघांचा बळी घेणाऱ्या बेजवाबदार चालकास अटक केली.

शहरातील नांदुरा मार्गावर हॉटेल पुष्पांजली आणि मारुती सुझुकी कार शोरूम आहे. या परिसरात गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. हॉटेल व शोरूमच्या संरक्षणासाठी येथे सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहे. हे दोघे सुरक्षा रक्षक हॉटेलसमोर खुर्च्या टाकून बसले होते. याचवेळी भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने त्यांना जोराची धडक दिली. वाहनाचा वेग आणि धडक इतकी भीषण होती की, दोघे सुरक्षा रक्षक अक्षरशः चिरडल्या गेले. दोघांनाही रुग्णालयात नेट असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

या दुर्दैवी अपघातात गोविंद किसन शेगोकार (६४) आणि विवेक देविदास पायघण (४१) यांचा करुण अंत झाला. एका पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी वॅगनार कारने (क्रमांक एम एच १५ जिएफ ८०७३) त्यांना भीषण धडक दिली. घटनेची माहिती मिळताच खामगाव शहर पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवली. सुरुवातीला ही कार एक अल्पवयीन मुलगी चालवत असल्याची चर्चा होती, मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी केली असता ती अफवा असल्याचे उघड झाले. सीसीटीव्ही फुटेजवरून प्रितपालसिंग अमरजितसिंग संधू (रा. अनिकट मार्ग, खामगाव) ही कार चालवत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली आहे.

याप्रकरणी मृताचा भाऊ राजेंद्र किसन शेगोकार यांनी फिर्याद दिली. तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसांनी आरोपी कार चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), १२५ (अ) (ब), २८१ आणि मोटार वाहन कायद्याच्या कलमा नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल पाटे करत आहेत. या घटनेमुळे खामगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, निष्पाप सुरक्षारक्षकांच्या मृत्यूने संतापही व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!