May 14, 2026 3:08 am

वंदे भारतमध्ये टीसीचा ‘विनापावती’ कारभार

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

भारतीय रेल्वेमध्ये महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमधून भ्रष्टाचाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रवाशाला विनापावती स्वस्त दरात तिकीटाची ऑफर देणाऱ्या एका तिकीट निरीक्षकाला रेल्वे प्रशासनाने तडकाफडकी निलंबित केले आहे.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, रेल्वेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

बिहारमधून सुटणाऱ्या एका वंदे भारत एक्सप्रेसमध्ये हा प्रकार घडला. व्हायरल व्हिडिओमध्ये एक प्रवासी आणि टीसी यांच्यातील संवाद स्पष्टपणे ऐकू येत आहे. प्रवाशाकडे सुपरफास्टचे तिकीट होते, मात्र त्याला बनारसपर्यंतचा प्रवास वंदे भारतने करायचा होता. टीसीने त्याला सांगितले की, “जर तू अधिकृत पावती घेतली तर तुला ७०० ते ७५० रुपये द्यावे लागतील, पण जर पावती नको असेल तर ३८० रुपयांत काम होईल.”

टीसीने दिलेली ही डिस्काउंटची ऑफर रेल्वेच्या महसुलावर डल्ला मारण्याचा प्रकार होता. प्रवाशाने ही सर्व चर्चा आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आणि सोशल मीडियावर पोस्ट केली.

व्हिडिओमध्ये, टीसीने प्रवाशाला पुढच्या चर्चेसाठी रेल्वे अटेंडंटकडे पाठवले. मात्र, कॅमेरा पाहून सावध झालेल्या अटेंडंटने कोणत्याही प्रकारची डील करण्यास नकार दिला आणि पुन्हा टीसीकडे जाण्यास सांगितले. रेल्वे नियमांनुसार, तिकीट नसलेल्या प्रवाशाकडून दंड आकारून अधिकृत पावती देणे बंधनकारक आहे, मात्र इथे टीसी स्वतःच्या खिशात पैसे टाकण्याच्या प्रयत्नात होता.

व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे सेवा आणि दानपूर रेल्वे विभागाने याची गंभीर दखल घेतली. प्राथमिक चौकशीनंतर संबंधित टीटीईला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. अनेक युझर्सनी संताप व्यक्त करत, वंदे भारतसारख्या प्रीमियम ट्रेनमध्येही जर असे चालत असेल, तर सामान्य गाड्यांची काय अवस्था असेल? हा सत्तेचा आणि पदाचा गैरवापर आहे, असं म्हटलं. तर काही युझर्सनी गमतीने, टीसी बिचारा प्रवाशाची मदतच करत होता आणि त्याचे पैसे वाचवत होता, असं म्हटलं.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!